पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत 15 वर्षांखालील मुलांच्या गटात श्रेयस माणकेश्वर, आराध्य पाटील, रामानुज जाधव यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
पीवायसी क्लबच्या हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत आठव्या मानांकित श्रेयस माणकेश्वरने आदित्य सामंतचा 8-11, 11-8, 9-11, 11-5, 11-7 असा संघर्षपूर्ण पराभव केला. रामानुज जाधवने गौतम सहस्त्रबुद्धेला 11-5, 11-5, 11-1 असे सहज पराभूत केले. सहाव्या मानांकित आराध्य पाटीलने अली कागदीवर 11-7, 11-8, 11-4 असा एकतर्फी विजय मिळवला. सिद्धार्थ देशमुखने मोहिल ठाकूरचे आव्हान 8-11, 11-7, 8-11, 11-5, 11-6 असे संपुष्ठात आणले. सुमेध परांजपेने अनिश रायकरला 11-7, 11-4, 11-2 असे नमविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 15 वर्षांखालील मुले:
श्रेयस माणकेश्वर[8] वि.वि.आदित्य सामंत 8-11, 11-8, 9-11, 11-5, 11-7;
सिद्धार्थ देशमुख वि.वि. मोहिल ठाकूर 8-11, 11-7, 8-11, 11-5, 11-6;
सुमेध परांजपे वि.वि. अनिश रायकर 11-7, 11-4, 11-2;
रामानुज जाधव वि.वि.गौतम सहस्त्रबुद्धे 11-5, 11-5, 11-1;
आयुष भट वि.वि.अनंत कारमपुरी 11-9, 11-5, 11-9;
देवयांक गोवंडे वि.वि.हिमांशू पटवर्धन 11-9, 12-10, 7-11, 11-8;
आराध्य पाटील[6] वि.वि.अली कागदी 11-7, 11-8, 11-4;
ध्रुव तोष्णीवालवि.वि.आयुष नंबिसन 4-11, 9-11, 11-8, 15-13, 11-6;
निषाद लेले वि.वि.शारंग गवळी 11-7, 8-11, 11-6, 10-12, 13-11;
दर्शन भिडे[7] वि.वि.रायन डिसूझा 9-11, 11-8, 11-7, 8-11, 11-3;
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या टी२० स्पेशालिस्टला करायचयं कसोटी संघात पुनरागमन; भारताबद्दल म्हणाला…
‘दीपक हुड्डासोबत प्रॅक्टिस सेशन परवडत नव्हते, तो बॉल थेट…’, प्रशिक्षकांनीच दिले स्पष्टीकरण
मोठी बातमी। सानिया मिर्झाने यूएस ओपनमधून घेतली माघार! पोस्ट करत सांगितले खरे कारण