IND vs BAN, Kanpur Test : बांगलादेशात सध्या राजकीय अशांतता पसरली आहे. अशातच बांगलादेशचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. भारत विरुद्ध बांगलादेश संघात आतापर्यंत चेन्नई येथे पहिला कसोटी सामना पार पडला असून यजमानांनी 280 धावांच्या फरकाने ही लढत जिंकली आहे. यानंतर 27 सप्टेंबरपासून उभय संघांना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर दुसरा व शेवटचा कसोटी सामना खेळायचा आहे. मात्र या सामन्याला आंदोलकांचा धोका निर्माण झाला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कानपूर येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
खरे तर, काही दिवसांपूर्वी बांगलादेशातून हिंदूंवरील कथित अत्याचाराच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर भारतातही अनेक ठिकाणी बांगलादेशविरोधात आंदोलने करण्यात आली. अशावेळी बांगलादेशचा संघ भारतात येऊन क्रिकेट सामने खेळत असल्याने अखिल भारतीय हिंदू महासभेने नाराजी व्यक्त केली आहे. कानपूर कसोटी सामन्यापूर्वी अखिल भारतीय हिंदू महासभेचे सदस्य स्टेडियमबाहेर विरोध करत होते. मैदानाच्या गेट क्रमांक 10 बी समोरील रस्त्यावर मोठ्या संख्येने आंदोलक रस्ता ब्लॉक करून हवन करत होते. याप्रकरणी हिंदू महासभेच्या 20 सदस्यांविरुद्धही एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमच्या बाहेर सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. कानपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त हरीश चंदर यांनीही पुरेशा पोलीस बळाची मागणी केली आहे.
ग्वाल्हेर बंद ठेवण्याची घोषणा केली
कानपूरशिवाय ग्वाल्हेरमध्येही हिंदू महासभेच्या सदस्यांनी आंदोलने केली आहेत. कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. 6 ऑक्टोबर पासून टी20 मालिकेची सुरुवात होणार आहे. हिंदु महासभेने भारत-बांगलादेश संघातील टी20 मालिकेलाही विरोध दर्शवला असून 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेर बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. मात्र, या काळात जीवनावश्यक वस्तूंवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिनच्या मुलाची देशांतर्गत क्रिकेटमधून करोडोंची कमाई! त्याची एकूण संपत्ती किती?
IND vs BAN: दुसऱ्या कसोटीत पडणार रेकाॅर्ड्सचा पाऊस? ‘हे’ दिग्गज रचणार इतिहास
“त्याला शांत करावे लागेल” बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य