इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटपटू केवीन पीटरसन सध्या कारकिर्दीतील शेवटच क्रिकेट खेळत आहे. तो सध्या पाकिस्तान सुपर लीग मधील क्वेट्टा ग्लॅडीएटर संघाकडून खेळत आहे.
ही स्पर्धा सध्या दुबईमध्ये सुरु आहे. या स्पर्धेच्या Eliminator च्या फेऱ्या पाकिस्तानमधील लाहोर येथे तर अंतिम सामना कराची येथे होणार आहे.
क्वेट्टा ग्लॅडीएटरने काल झालेल्या सामन्यात पीटरसनच्या ३४ चेंडूत ४८ धावांच्या खेळीच्या जोरावर इस्लामाबाद युनायटेडचा ६ विकेट्सने पराभव केला.
सामना झाल्यावर पत्रकार परिषदेत पीटरसनला विचारण्यात आले की जर क्वेट्टा ग्लॅडीएटर Eliminatorला पात्र ठरला तर तु सामने खेळायला पाकिस्तानात जाणार का? यावर त्याने एका शब्दात नाही असे उत्तर दिले. याचा विडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
क्वेट्टा ग्लॅडीएटरने पाकिस्तान सुपर लीगमध्ये ३ पैकी २ सामने जिंकले आहेत.
KP says no to going to Pakistan for the PSL if Quetta Gladiators qualify #PSL2018 pic.twitter.com/GsfuelJSOe
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) February 28, 2018






