क्रिकेट मैदानावर अनेकदा खेळाडूंना दुखापत होताना दिसते. काही खेळाडूंना चेंडू लागल्यामुळे, तर कधीकधी क्षेत्ररक्षण करताना इतर काही कारणांमुळे दुखापत होते. असेच काहीसे पाकिस्तान सुपर लीग 2021 च्या क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध पेशावर जालमी या सामन्यात घडले. (psl 2021 faf du plessis ruled out of remaining psl matches)
या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज फाफ डू प्लेसिसला आपल्या सहकारी खेळाडूची धडक लागल्यामुळे मानेच्या जवळपास दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला कन्कशनचा त्रास होत आहे. याच कारणामुळे त्याने या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांतून माघार घेतली आहे.
झाले असे की, सामन्यादरम्यान क्वेटा ग्लॅडिएटर्सचा खेळाडू फाफ डू प्लेसिस हा सीमा रेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. दरम्यान चेंडू अडवण्याचा प्रयत्नामध्ये तो संघसहकारी मोहम्मद हसनैनला धडकला. दोघांमध्ये धडक झाल्यानंतर डू प्लेसिसने लगेच मैदान सोडले होते. त्यानंतर त्याला तपासणीसाठी तातडीने रुग्णालयामध्ये नेण्यात आले.
Thank you everyone for all the messages of support. I'm back at the hotel recovering. Have concussion with some memory loss but I will be fine. Hopefully be back on the field soon. Much love. ❤️
— Faf Du Plessis (@faf1307) June 13, 2021
पेशावर जालमीविरुद्ध खेळताना सामन्याच्या सातव्या षटकात फाफ डू प्लेसिस आणि हसनैन हे दोघे चौकार अडवण्याचा प्रयत्न करत असताना त्या दोघांमध्ये धडक झाली. हसनैनचा गुडघा डू प्लेसिसच्या डोक्यावर लागल्यामुळे डू प्लेसिस जमिनीवर कोसळला. यानंतर तो बुधवारी (१६ जून) रात्री आपल्या मायदेशी दक्षिण आफ्रिकेला परतला. रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर फाफ डू प्लेसिसने सांगितले की, “कन्कशनच्या कारणाने काही काळ मी गोष्टी विसरलो होतो. मात्र, आता सर्वकाही व्यवस्थित आहे.”
#FafduPlessis Get Well Soon Dear Faf you are my one of the favorite players of cricket RT if yours pic.twitter.com/dEp0k7FgBz
— Jaishiv Gupta (@shriraamcharan2) June 13, 2021
पाकिस्तान सुपर लीगच्या या मोसमात डू प्लेसिसने ५ सामन्यांमधील ४ डावात ७६ धावा बनवल्यात. या मोसमात क्वेटा ग्लॅडिएटर्सला ९ सामन्यांमध्ये केवळ चार गुणमिळवता आले आहेत. ते गुणतालिकेमध्ये सर्वात खाली आहे.
त्याच्या एक दिवस अगोदर वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेललाही सामन्यादरम्यान डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पीएसएलच्या सहाव्या मोसमात क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड संघातील सामन्यात क्वेटा ग्लॅडिएटर्सचा खेळाडू आंद्रे रसेल फलंदाजी करत असताना त्याच्या डोक्याला चेंडू लागला होता. डोक्याला चेंडू लागल्यामुळे त्याला स्ट्रेचरवर मैदानाच्या बाहेर नेण्यात आले. सामन्याच्या १४ व्या षटकात त्याला ही दुखापत झाली. कनक्शन नियमाप्रमाणे त्याच्या जागी वेगवान गोलंदाज नसीम शाहला मैदानात उतरविण्यात आले. यावरून थोडावेळ वादही झाला. कारण आंद्रे रसेल हा अष्टपैलू खेळाडू आहे आणि नसीम शाह हा वेगवान गोलंदाज आहे, पण थोड्या वेळानेहा वादही शांत झाला.
महत्वाच्या बातम्या-
ट्रेंट बोल्टने रोहित शर्माला आयपीएल दरम्यानच दिली आहे ‘ही’ चेतावणी, आता राहावे लागणार सावध
रोहित शर्माला WTC फायनलपूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणचा ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ सल्ला
WTC फायनलसाठी कशी असायला हवी भारताची फलंदाजी क्रमवारी? व्हीव्हीएस लक्ष्मणने दिले ‘हे’ उत्तर