क्रिकेटला ‘जेंटलमेन’ गेम म्हणून ओळखले जाते. परंतु क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला अनेकदा खेळाडूंमध्ये वाद छोटे-मोठे वाद झाल्याचे पाहायला मिळतात. कधी आपापसांत चकमकी होतात तर कधीकधी विरोधी संघांतील खेळाडूंमध्ये भांडण पेटते. असेच काही काल (१५ जून) पाकिस्तान सुपर लीग २०२१ मध्ये दिसले. लीगचा २३ वा सामना हा क्वेटा ग्लैडिएटर्स आणि लाहौर कलंदर्स यांच्यात खेळवला गेला.
सामना चालू असताना युवा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी आणि पाकिस्तानचा माझी कर्णधार सर्फराज अहमद या दोघांमध्ये वाद झाला. त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि पुढे प्रकरण एवढे वाढले की इतर खेळाडू व पंचांना मध्यस्ती करावी लागली.
झाले असे की, सामन्यादरम्यान क्वेटा ग्लैडिएटर्सच्या डावातील १९व्या षटकात वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदीने सर्फराज अहमदला एक जोरदार बाउन्सर टाकला. तो चेंडू सरळ सर्फराझच्या डोक्यावर जाऊन लागला. तरीही त्याने कसाबसा चेंडू मारला आणि एक धाव घेतली. परंतु हेल्मेटवर चेंडू लागल्यानंतर सर्फराज अचानक चिडला व त्याने शाहीन अफ्रिदीला काही अपशब्द म्हटले. हे ऐकून शाहीन अफ्रिदी ऐकून चिडला व रागात तो सर्फराजकडे गेला. पुढे तो वाद एवढा वाढला की, पंच व खेळाडूंना मध्यस्ती करत त्यांना शांत करावे लागले.
https://twitter.com/zorawarrr/status/1404815093624414210?s=20
या घटनेनंतर सर्फराजच्या या अशा वागण्यावर अनेकांनी प्रश्न केले आहेत. समालोटक पॉमी बांग्वा म्हणाला की, ‘सर्फराज अहमद हा वरिष्ट खेळाडू आहे. याचा असा अर्थ नाही की, तो शाहीन अफ्रिदीला बाउन्सर टाकण्यापासून थांबवू शकतो.’
शाहीनने याच षटकात पहिले एक बाउन्सर टाकला होता. त्यामुळे दुसऱ्या बाउन्सरची अपेक्षा सर्फराजने केली नव्हती. परंतु त्याउलट झाले आणि शाहीने षटकाच्या शेवटी अजून एक जोरदार बाउन्सर टाकला.
डाव संपल्यानंतर शाहीन अफ्रिदीला बाउन्सर फेकण्यावरून काही प्रश्न केले गेले. त्यावर तो म्हणाला की, ‘जर एखाद्या फलंदाजाने चौकार मारला. तर मला चांगले नाही वाटत. हा एक खेळाचा भाग आहे. वेगवान गोलंदाजांचे आक्रमक होणे साहजिक आहे.’ क्वेटा ग्लैडिएटर्सचा कर्णधार सर्फराज अहमदने २७ चेंडूत नाबाद ३४ धावांची खेळी केली. तर शाहिन एकही विकेट घेऊ शकला नाही.
महत्वाच्या बातम्या
किवींना आस्मान दाखवण्यास सज्ज! जड्डूच्या गोलंदाजीवर पंतचा गगनचुंबी षटकार, एकदा पाहाच
‘हे काय घातलंस, तू भारतीय क्रिकेटपटू आहेस,’ द्रविडने एका टी-शर्टवरुन घेतली होती रैनाची शाळा
भारतीय संघाचा धुव्वा उडवण्यासाठी ‘या’ ११ खेळाडूंसह न्यूझीलंड संघ उतरणार मैदानावर!






