पाकिस्तान सुपर लीग 2023 मधील बहुप्रतिक्षीत सामना रविवारी (26 फेब्रुवारी) पाहायला मिळाला. गद्दफी स्टेडियममद्ये लाुर कलंदर्स आणि पेशावर जल्मी यांच्यात हा सामना खेळला गेला. पाकिस्तान आणि पेशावर जल्मी संघाचा कर्णधार बाबर आझम आणि लापोर कलंदर्स संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदी यांच्यातील आमना सामना पाहण्यासाठी चाहते मागच्या काही दिवसांपासून वाट पाहत होते. रविवारी अखेर बाबर आफ्रिदीच्या घातक चेंडूपुढे अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले.
शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने टाकलेल्या एका घातक चेंडूवर बाबर आझम (Babar Azam) त्रिफळाचीत झाला. बाबरने ज्या पद्धथीने विकेट गमावली त्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे आफ्रिदीच्या या चेंडूवचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. पाकिस्तान संघाचे माजी दिग्गज गोलंदाज वकार युनिस यांनीही आफ्रिदीचे तोंड भरून कौतुक केले. “जर हा चेंडू बाबर आझमला खेळता येत नसेल, तर जगातील कोणताच फलंदाज हा चेंडू खेळू शकत नाही,” असे वक्तव्य युनिसने केले. हे एकप्रकारे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या भारतीय फलंदाजांना आव्हान असल्याचे बोलले जात आहे. आफ्रिदीने टाकलेला हा चेंडू सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.
.@iShaheenAfridi is 🔛 fire ❤️🔥
The perfect delivery to dismiss @babarazam258 ✨#HBLPSL8 | #SabSitarayHumaray | #LQvPZ pic.twitter.com/pHEIYuR9sl
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 26, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर लाहोर कलंदर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 241 धावा कुटल्या. फखर जमां याने 96 आणि अब्दुल्ला शफीकने 75 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त सॅम बिलिंग्जने 47 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात पेशावर जल्मीने 20 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 201 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने चार षटकात 40 धावा खर्च केल्या, पण पाच विकेट्सदेखील नावावर केल्या. पेशावरचा कर्णधार बाबर आझम अवघ्या 4 धावा करून तंबूत परतला.
(Babar Azam was clean bowled by a dangerous ball from Shaheen Afridi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुमराहचे करियर धोक्यात! आता आयपीएल खेळण्यावरही प्रश्नचिन्ह, WTC फायनलसाठी राहणार अनुपलब्ध?
ऑस्ट्रेलियन महिलांनी रचला इतिहास! टी20 विश्वचषक जिंकण्याची दुसरी हॅट्रिक, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी