भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा मागील जवळपास सहा महिन्यांपासून भारतीय संघासाठी क्रिकेट खेळला नाही. पाठीच्या दुखापतीमुळे आशिया चषक व टी20 विश्वचषक या महत्त्वाच्या स्पर्धा तो खेळू शकला नव्हता. त्यानंतर आता सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतून तसेच आगामी वनडे मालिकेतून त्याने माघार घेतलेली. मात्र, त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आणखी तीन महिने लांबण्याची शक्यता आहे.
बुमराह मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होत असलेल्या आयपीएलमधून पुनरागमन करण्याची चर्चा सुरू होती. मात्र, आता मिळत असलेल्या माहितीनुसार तो संपूर्ण आयपीएलही खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार,
‘सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन करत असलेला बुमराह अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे तो आता आयपीएल 2023 ला मुकू शकतो. तसेच, जून महिन्यात होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ पात्र झाल्यास, तेथे देखील बुमराह उपलब्ध असणार नाही. बीसीसीआय त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. बीसीसीआयने ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वनडे विश्वचषकात बुमराहला खेळवण्याचे लक्ष ठेवलेय.’
बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. बुमराह उपलब्ध नसल्याने मुंबईच्या गोलंदाजीची धुरा जोफ्रा आर्चर याच्या खांद्यावर असेल. त्याने मुंबईसाठी आत्तापर्यंत 2013 आयपीएलपासून 120 सामने खेळताना 145 बळी टिपले आहेत. तर, भारतासाठी त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 128, वनडेत 119 व टी20 क्रिकेटमध्ये 67 बळी आपल्या नावे केलेत. बुमराह भारताचा सध्या प्रमुख वेगवान गोलंदाज असला तरी, त्याच्या स्वतःच्या दुखापतीमुळे संघाला नुकसान सोसावे लागत आहे.
(Jasprit Bumrah Might Miss IPL 2023 For Mumbai Indians WTC Final In Doubt)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आधी बीए पास कर आणि मग पीसीबी अध्यक्ष…’, माजी दिग्गजाचा शोएब अख्तरवर निशाणा
दिल्लीला दुहेरी धक्का! पंतच्या जागी यष्टीरक्षण करणारा खेळाडूही दुखापतग्रस्त, नुकताच गाजवलेला देशांतर्गत हंगाम