---Advertisement---

शाहीन आफ्रिदी कर्णधार म्हणूनही चमकला! आपल्या संघाला पीएसएलचे विजेतेपद जिंकून देत स्मिथ, रोहितला पछाडलं

On: सोमवार, फेब्रुवारी 28, 2022 2:23 PM
Shaheen-Shah-Afridi
---Advertisement---

रविवारी (२७ फेब्रुवारी) पाकिस्तान सुपर लीगचा (PSL 2022) अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात लाहोर कलंदर्स (Lahore Qalandars) आणि मुल्तान सुल्तान (Multan Sultans) आमने सामने होते. या सामन्यात शाहीन शाह अफ्रिदी याच्या (Shaheen Afridi) नेतृत्वाताल लाहोर कलंदर्स संघाने ४२ धावांनी विजयी मिळवला आणि स्पर्धेची ट्रॉफी नावावर केली. या विजयासह शाहीन अफ्रिदीने स्वतःच्या नावावर मोठा विक्रम आहे.

शाहीन अफ्रिदी आता सर्वात कमी वयात स्वतःच्या संघाला टी-२० लीग जिंकवून देणार कर्णधार बनला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथला (Steve Smith) याच्या नावार होता. स्मिथने २२ वर्षे आणि २४० दिवसांच्या वयात सिडनी सिक्सर्सला बिग बॅश लीगचे विजेतेपद  मिळवून दिले होते.

भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या यादीत तिसऱ्या क्रमांकावार घसरला आहे, जो आधी दुसऱ्या क्रमांकावर होता. रोहितने तो २६ वर्षे आणि ३२७ दिवसांचा असताना मुंबई इंडियन्सला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले होते. अफ्रिदीने आता या दोघांना मागे टाकून वयाच्या अवघ्या २१ वर्षे आणि ३२७ व्या दिवशी लाहोर कलंदर्सला पीएसएलचे जेतेपद जिंकवून दिले आहे.

दरम्यान, लाहोर कलंदर्स आणि मुल्तान सुल्तान यांच्यातील अंतिम सामन्याचा विचार केला, तर लाहोरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करतना लाहोरने ५ विकेट्सच्या नुकसनावार १८० धावा केल्या. प्रत्युत्तरात मुल्तान सुल्तानने १९.३ षटकात १३८ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. परिणामी लाहोरने गतविजेत्या मुल्तान सुल्तानला ४२ धावांनी पराभूत केले.

फलंदाजीदरम्यान लाहोर कलंदर्सची सुरुवात निराशाजन झाली होती. अवघ्या २५ धावांवर संघाने तीन महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. परंतु ,त्यानंतर अनुभवी मोहम्मद हफीजने महत्वाच्या ६९ धावा केल्या आणि संघाला अपेक्षित धावसंख्येपर्यंत घेऊन गेला. हाफीजनंतर हॅरी ब्रुक (४१) आणि डेविड विस (२८) यांनी महत्वाचे योगदान दिले आणि शेवटपर्यंत नाबाद राहिले. मुल्ताना सुल्तानसाठी आसिफ अफरिदीने १९ धावा खर्च करून ३ महत्वाच्या विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या बातम्या –

चार टी२० सामने, जेव्हा भारतीय यष्टीरक्षक बनले ‘सामनावीर’; पण धोनीचे मात्र नाव नाही

भविष्यासाठी चेन्नई सुपर किंग्सचे मोठे पाऊल, युवा खेळाडूंसाठी करणार ‘ही’ महत्त्वाची गोष्ट

वाढदिवस विशेष: टेम्पो चालकाचा मुलगा ते नेट बॉलर अन् आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवण्यास सज्ज, वाचा त्याची कहाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---