पाकिस्तान क्रिकेट वर्तुळाला हलवणारी एक बातमी सध्या समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची सर्वोत्तम टी20 लीग असलेल्या पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) या स्पर्धेतील मुलतान सुलतान संघाचे संघमालक आलमगीर तरीन यांनी आत्महत्या केली. 63 वर्षीय आलमगीर यांनी आपल्या राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेत जीव दिला. आलमगीर हे पाकिस्तानातील वरिष्ठ राजकारणी जहांगीर तरीन यांचे बंधू होत.
तरीन हे अद्याप अविवाहित होते. डिसेंबर महिन्यात ते लग्न करणार होते. आत्महत्येनंतर त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट देखील आढळून आली असून, यामध्ये सततच्या आजारपणामुळे आपण जीव देत असल्याचे त्यांनी म्हटले.
तरीन संघमालक असलेल्या मुलतान संघाने 2020 व 2022 असे दोन वेळा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. या संघाचे नेतृत्व पाकिस्तानचा अनुभवी सलामीवीर मोहम्मद रिझवान हा करतो. रिझवान याच्यावर धिम्या गतीने खेळण्याचा आरोप झाल्यानंतर, तरीन यांनीच माध्यमानसमोर येत त्याचा बचाव केला होता. 2016 मध्ये एका प्रकरणात त्यांनी थेट सिंध प्रांताच्या मुख्यमंत्र्याच्या घरासमोर कचरा फेकत अनोखे आंदोलन केले होते.
(PSL Team Multan Sultan Team Owner Alamgir Tareen Commited Suicide)
महत्वाच्या बातम्या-
‘आता तू नाहीये म्हणून मीच…’, धोनीच्या वाढदिवशी पंतने उचलले ‘हे’ पाऊल, पाहा कसे केले सेलिब्रेशन
बाप कर्णधार असला तरीही धोनी खेळला आहे ‘या’ ५ सिनीयर-ज्युनियर कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली