भारत विरुद्ध पाकिस्तान, या क्रिकेट सामन्यातून क्रिकेटरसिंकाचे पैसावसूल मनोरंजन होते. परंतु २०१२-१३ पासून उभय संघ एकमेकांचा दौरा करत नाहीत. केवळ आयसीसी स्पर्धांदरम्यानच दोन्ही संघांची लढत होते. परंतु २०१२ पूर्वी भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये बऱ्याच द्विपक्षीय मालिका झाल्या होत्या.
त्यातील २००४ सालचा भारताचा पाकिस्तान दौरा (India Tour Of Pakistan 2004) अविस्मरणीय असा होता. या दौऱ्यात भारतीय संघाने ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-२ आणि ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता. या दौऱ्यावेळी पाकिस्तानने भारताविरुद्ध काय योजना आखल्या (Plan Against India) होत्या?, याबद्दल आता शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
स्पोर्ट्सकीडाच्या चॅट शोदरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज अख्तरने माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफला (Mohammad Kaif) ही योजना ऐकवली आहे. “आम्ही भारतीय फलंदाजांसाठी वेगवान खेळपट्टी तयार करणार होतो. कोरडी पण वेगवान, ज्यावर ३५० सारखी धावसंख्या उभी करता आली नाही पाहिजे. आमची योजना पहिल्या सामन्यातच भारतीय संघावर दबाव बनवण्याची होती आणि त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यासाठी वेगवान खेळपट्टी बनवायची होती. मानसिकरित्या तुमच्यावर दबाव बनवायचा होता,” असे अख्तर म्हणाला.
दुसरीकडे कैफने मात्र त्या दौऱ्यावेळी पाकिस्तानकडून मिळालेल्या प्रेमाची स्तुती केली. “आम्हा सर्वांना पाकिस्तानमध्ये या दौऱ्यादरम्यान भरपूर प्रेम आणि सन्मान मिळाला. फक्त मला एकट्यालाच नव्हे तर सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली सर्वजण त्या दौऱ्याबाबत असेच बोलतील. आम्हाला त्यावेळी खरेदी करण्यासाठी परवानगी घ्यावी लागली. परंतु जसे आम्ही सामान खरेदीसाठी निघालो, तसे कोणीही आमच्याकडून पैसे घेतले नाही. सर्वजण आम्हाला म्हणत होते की, तुम्ही भारतातून येथे क्रिकेट खेळायला आला आहात. तुम्ही आमचे पाहुणे आहात,” असे कैफ म्हणाला.
दरम्यान भारत आणि पाकिस्तान संघात आतापर्यंत २०० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी ७० सामने भारताने जिंकले आहेत. तर ८७ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! पुण्यात होणाऱ्या महिला आयपीएलसाठी तीन संघांतील खेळाडूंची घोषणा, ‘या’ तिघींकडे कर्णधारपद
जबराट! बटलर-परागने मिळून बाऊंड्रीजवळ अफलातून कॅच घेत कृणालला धाडले माघारी, पाहा Video
हिला डाला ना! ओडियन स्मिथ इतका जोरात शिंकला की, पंजाबचे खेळाडू धडाधड कोसळले, Video व्हायरल