---Advertisement---

शांत अन् संयमी नव्हे ओव्हलवरील खेळीत दिसला पुजाराचा ‘रुद्रावतार’, मोईनला शिकवला धडा!

On: रविवार, सप्टेंबर 5, 2021 11:54 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. दोन्ही संघ सध्या या मालिकेत १-१ च्या बरोबरीत आहेl. भारतीय संघाने चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात ३ गडी गमवत २७० धावा केल्या आणि १७१ धावांची आघाडी घेतली आहे. यात चेतेश्वर पुजाराने अर्धशतकीय खेळी करत मोलाचे योगदान दिले. या खेळीत तो एका वेगळ्याच लयीत दिसत होता. दरम्यान तो आणि इंग्लंडचा फिरकी गोलंदाजी अष्टपैलू मोईन अली यांच्यातील द्वंद्वाचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

जेम्स अँडरसनने तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताचा सलामीवीर केएल राहुलला 46 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. मात्र, त्याच्यानंतर फलंदाजीसाठी आलेला चेतेश्वर पुजारा पूर्णपणे वेगळ्या योजनेसह खेळताना दिसला. यापूर्वी तो या लयीत या दौऱ्यावर तरी दिसला नव्हता.

त्यातही जेव्हा मोईन अली भारतीय डावाचे ४० वे षटक टाकण्यासाठी आला; तेव्हा षटकाचा शेवटचा चेंडू अलीने आखूड टाकला. यावेळी साधारणपणे बचाव करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पुजाराने आक्रमक रुप धारण केल्याचे दिसले. त्याने आक्रमक पवित्रा घेत चेंडू चार धावांसाठी सीमारेषेकडे टोलवला. जर चेंडू अजून काही फूट दूर गेला असता; तर पुजाराला ६ धावा मिळाल्या असत्या.

पुजाराने हा चौकार मारताना बॅटला गोल भिरकावले आणि त्यादिशेने वळाला. यावेळी त्याने इतका जोर की, संतुलन बिघडल्याने तो यष्टीवर पडण्याची शक्यता होती. परंतु त्याने स्वत:ला लवकरच सावरले.

https://twitter.com/ViratAkhilHari1/status/1434123803139870727?s=20

दरम्यान केएल राहुल आणि रोहित शर्माने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ८३ धावांची सलामी दिली. पुढे रोहितने शानदार १२७ धावांची खेळी केली. तर राहुलने ४६ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच पुजारानेही महत्त्वपूर्ण ६१ धावा जोडल्या. यानंतर विराट कोहली २२ तर रवींद्र जडेजा ९ धावांवर खेळत आहे. भारताकडे सध्या १७१ धावांची आघाडी आहे.

याआधी, सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला होता. भारतीय संघाच्या प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडचा पहिला डाव २९० धावांवर सर्वबाद झाला आहे. यासह इंग्लंडने भारतीय संघावर दुसऱ्या डावासाठी ९९ धावांची आघाडीही घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

‘हा उदय सर्वांना पुरुन उरणारा’, ओव्हलवरील शतकानंतर रोहितचे जुने ट्वीट व्हायरल; चाहत्यांच्या आल्या भन्नाट प्रतिक्रिया

भारताची भक्कम भिंत…! पाय मुरगळला, तरीही पट्टी बांधून ‘लढवय्या पुजारा’चे अर्धशतक- Video

कडक षटकार अन् शतकाला गवसणी, रोहितच्या क्लास सेंचूरीनंतर पत्नीची ‘फ्लाइंग किस’; व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---