लीड्स कसोटीच्या पहिल्याच दिवशी प्रत्येकाला कल्पना होती की, या सामन्याचा निकाल काय लागणार आहे. पहिल्याच दिवशी भारतीय संघ 78 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर इंग्लंड संघाने 354 धावांची आघाडी घेत पाहुण्या संघावर दबाव वाढवला. दुसऱ्या डावातही भारतीय संघाला फक्त 278 धावा करता आल्या आणि त्यांनी लीड्स कसोटी एक डाव आणि 76 धावांनी गमावली.
भारतीय संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांचा खराब फॉर्म. पुजारा आणि कोहलीने लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात निश्चितपणे अर्धशतके ठोकली. पण त्यांना भारतीय संघाचा पराभव टाळता आला नाही. भारतीय संघाची ही त्रिमूर्ती इंग्लंडपुढे अपयशी ठरली आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार जो रूट त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन करताना दिसला आहे.
सध्याच्या मालिकेत कोहली, रहाणे आणि पुजारा या तिघांना मिळूनही रूटपेक्षा जास्त करता आल्या नाहीत. या दिग्गज खेळाडूंनी रूटपेक्षा 126 धावा कमी केल्या आहेत. रूटने कसोटी मालिकेत आतापर्यंत 5 डावांमध्ये 507 धावा केल्या आहेत, ज्यात 3 शतके आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे. त्याने नॉटिंगहॅम, लॉर्ड्स आणि लीड्स कसोटीत शतके केली आहेत. दुसरीकडे रहाणे, कोहली आणि पुजाराने मालिकेत प्रत्येकी 1 अर्धशतक केले आहे.
कोहली, रहाणे आणि पुजारा यांनी मिळून संपूर्ण मालिकेत फक्त 381 धावा केल्या आहेत. या धावा रूटच्या 507 धावांपेक्षा 126 धावांनी कमी आहेत. कोहलीने मालिकेच्या 5 डावांमध्ये 24.80 च्या सरासरीने केवळ 124 धावा केल्या आहेत. रहाणेने 5 डावांमध्ये 19 च्या सरासरीने 95 धावा केल्या आहेत. तर पुजाराने 32.40 च्या सरासरीने 162 धावा केल्या आहेत. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, भारतातील तिन्ही दिग्गजांवर एकटा रूट भारी पडला आहे.
कोहली, पुजारा असो किंवा रहाणे, हे तिन्ही खेळाडू इंग्लंडच्या स्विंग गोलंदाजीमुळे त्रस्त आहेत. ऑफ-स्टंपच्या बाहेर या तीन खेळाडूंना खूप त्रास होत आहे. बाहेर जाणाऱ्या चेंडूंला छेडणे या तीन खेळाडूंची सवय बनत आहे. हेच कारण आहे की, हे तिघेही स्लिपमध्येच बाद होत आहेत. जर त्यांनी लीड्समधील पराभवानंतर शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये हीच चूक केली तर भारतीय संघ मालिका कशी जिंकेल? हा मोठा प्रश्न आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कोण रूट? त्याला मुळासकट उपटून फेकू’; लीड्स कसोटीनंतर अमिताभ बच्चन यांचे ट्वीट व्हायरल
खराब फॉर्मातील भारतीय खेळाडूंची चौथ्या कसोटीतून हकालपट्टी; माजी क्रिकेटर म्हणाले, ‘बदल आवश्यक’
इंग्लंडपुढे रिषभ ठरला नामोहरम, कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच केली ‘ही’ लाजिरवाणी कामगिरी






