भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2 -1 ने विजय मिळवला आहे. भारताच्या या यशात अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. पुजाराने ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आपल्या शरीरावर अनेक जखमा झेलत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना केला. पुजाराच्या या अविश्वसनीय खेळीबद्दल संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून त्याचे कौतुक केले जात आहे.
पुजारासाठी मात्र ही खेळी फारच वेदनादायी ठरली. अनेक वेळा चेंडू त्याच्या शरीरावर आदळल्याने तो वेदनाग्रस्त जाणवत होता. मात्र या जखमांना बरे करण्यासाठी पूजाराच्या मुलीने एक उपाय शोधून काढला आहे.
मालिका संपल्यानंतर पुजाराने एका मुलाखीदरम्यान आपल्या मुलीच्या जखमा बऱ्या करण्याच्या उपायाबद्दल सांगितले आहे. पुजाराने सांगितले की, मुलगी आदिती म्हणाली होती की जिथे जिथे मला दुखापत झाली आहे तिथे ती किस करेल. त्यामुळे माझी दुखापत कमी होईल. कारण अदितीला जेव्हा दुखापत होते तेव्हा मी देखील हेच करतो.
दरम्यान पुजाराच्या कामगिरीचा विचार केला असता, त्याने ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी शानदार अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे पुजाराने तब्बल 211 चेंडू खेळून काढत 7 चौकरांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. पुजराच्या या खेळीमुळेच शुभमन गिल व रिषभ पंत यांना आक्रमक खेळी करण्याची संधी मिळाली व भारतीय संघ इतिहास रचत सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
सलग दोन वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्यामागे ‘या’ व्यक्तीचे आहे मोठे योगदान
“तुझ्याशिवाय आयपीएल पहिल्यासारखं असणार नाही”, मलिंगाच्या निवृत्तीने रोहित आणि बुमराह झाले भावूक
राम मंदीर उभारणीसाठी गौतम गंभीरचा हातभार; दिली ‘एवढ्या’ रुपयांची देणगी