---Advertisement---

‘तरीही मला का संधी नाही? खुप वाईट वाटतंय!’ भारताच्या विश्वचषक संघात निवड न झाल्याने ‘ती’ प्रचंड नाराज

india women odi
---Advertisement---

यंदाच्या वर्षी ४ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान महिला वनडे विश्वचषक स्पर्धा न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यापूर्वी भारतीय महिला संघ न्यूझीलंड दौऱ्यावर ५ वनडे आणि १ टी२० सामना खेळणार आहेत. या संपूर्ण न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा गुरुवारी (६ जानेवारी) करण्यात आली. हा संघ निवडताना निवड समीतीने अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, भारताची अनुभवी फलंदाज पूनम राऊत हिने तिला या दौऱ्यासाठी संधी न देण्यात आल्याबद्दल स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. 

निवड समीतीने वनडे विश्वचषकासाठी आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी सारखाच संघ निवडला आहे. या संघात पूनमला निवडण्यात आलेले नाही, याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करणारे ट्वीट तिने गुरुवारी रात्री केले.

तिने तिच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘अनुभवी फलंदाज आणि भारतासाठी सातत्याने धावा बनवणारी खेळाडू असूनही वनडे विश्वचषकासाठी संघाचा भाग होन न आल्याने खूप निराश आहे. २०२१ वर्षात मी ६ सामन्यांत ७३.७५ च्या सरासरीने २९५ धावा केल्या, ज्यात एक शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश होता. चांगल्या प्रदर्शनानंतरही सातत्याने संघाबाहेर रहाणे निराशाजनक आहे. पण, मी त्या खेळाडूंना शुभेच्छा देते, ज्या भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहेत.

पूनम राऊत २०२१ वर्षात वनडेमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारी तिसऱ्या क्रमांकाची महिला फलंदाज होती. तसेच सरासरीबाबत बोलायचे झाले, तर तिची २०२१ वर्षात सर्वाधिक सरासरी राहिली. मात्र, तिच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे तिने दाखवून दिले आहे.

पूनमने तिच्या कारकिर्दीत ४ कसोटी, ७३ वनडे आणि ३५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. तिने कसोटीत २६४ धावा, वनडेत २२९९ धावा आणि आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ७१९ धावा केल्या आहेत.

अधिक वाचा – मोठी बातमी! वनडे विश्वचषकासाठी १५ जणींचा भारतीय संघ जाहीर; जेमिमा रोड्रीग्ज, शिखा पांडे यांना संधी नाही

या खेळाडूंनाही संधी नाही
केवळ पूनम राऊतच नाही, तर निवड समीतीने महिला वनडे विश्वचषकासाठी जेमिमा रोड्रीग्ज, राधा यादव, शिखा पांडे यांसारख्या खेळाडूंनाही संधी दिलेली नाही. त्यामुळे अनेकांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते.

व्हिडिओ पाहा – टोकियो ऑलिम्पिक… भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा

असा आहे विश्वचषक आणि न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघ :
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टिरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया(याष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.

राखीव खेळाडू: एस मेघना, एकता बिश्त, सिमरन दिल बहादूर.

महत्त्वाच्या बातम्या –     

विराटने केपटाऊन कसोटीत पुनरागमन केल्यास ‘या’ दिग्गजाला प्लेइंग इलेव्हनमधून द्या डच्चू, गंभीरचा सल्ला

“हार्दिक पंड्याकडून ज्या अपेक्षा करत होतो, त्या शार्दुल ठाकूर पूर्ण करत आहे”

सूर्यकुमार यादवच्या पोस्टवर पतीसाठी रितिकाची हटके कमेंट; म्हणाली, ‘रोहितला माझ्याकडून…’

टोकियो ऑलिम्पिक... भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा | India at Tokyo Olympics 2020

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---