पुणे: महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेच्या मान्यतेने व अमरावती सॉफ्टबॉलच्या वतीने नुकत्याच झालेल्या २७ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेत पुरूष गटाच्या अंतिम सामन्यात पुणे जिल्हा संघाने अहमदनगर शहर संघाचा ३-० हामरनने पराभव करून विजेतेपद संपादन केले. तर, अहमदनगर शहर संघाने दुसरे स्थान तर, अमरावती व जळगाव यांनी संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले.
अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आंतराष्ट्रीय पिचर स्वप्निल गदादेच्या वेगवान पिचिंगच्या जोरावर पुणे जिल्हा संघाने अहमदनगर शहर संघाला ३-० होमरणने पराभूत करून विजेतेपद पटकावले. या सामन्यात ऋत्वीत फाटे, अक्षय मोगल यांनी प्रत्येकी एक होमर मारला. यासह शुभम काटकर, गौरव राजपूरे यांनी संघाच्या विजयात महत्वाची खेळी केली. अहमदनगर शहर संघाकडून पवन गुंजाळ व अभिषेक सोनावणे हे चांगली खेळी केली. तत्पूर्वी, उपांत्यफेरीत पुणे जिल्हा संघाने अमरावती संघाचा १४-० होमरणन धुव्वा उडविला. यावेळी पुणे जिल्हा संघाचा पिचर स्वप्निल गदादे याने अमरावती संघाचे ९ खेळाडू बाद केले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण अमरावती जिल्ह्याचा खासदार माननीय नवनीत रवी राणा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमरावती सॉफ्टबॉल असोसिएशन चे सचिव डॉ.सुराजसिह येवतीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारत मालिका गमावणार? दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ खेळाडू चौथ्या टी२०मध्ये करू दमदार शकतो पुनरागमन
‘कर्णधार’ हार्दिक मैदानात उतरताच ६३ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची होणार पुनरावृत्ती, असेल पाचवा संघनायक
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी२० सामना होऊ शकतो रद्द? हे आहे मोठे कारण