पुणे | पुणे जिल्हा कबड्डी असोशियशन आणि काळभैरव विकास प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ४५वी पुणे जिल्हा कुमार गट मुले आणि मुलींची जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक १७ ते बुधवार दिनांक २२ आॅगस्ट २०१८ दरम्यान या स्पर्धेचे सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रात हे सामने होणार आहे.
प्रो कबड्डी तसेच महा कबड्डीमुळे या खेळाला गतवैभव प्राप्त झाले आहे. याचीच झलक या स्पर्धेत पहायला मिळणार आहे. कारण ४४व्या पुणे जिल्हा कुमार गट अजिंक्यपद स्पर्धेच्या तुलनेने तब्बल दुप्पट संघांनी यावेळी नावनोंदणी केली आहे.
कुठे होणार ही स्पर्धा?
राजाराम भिकू पठारे स्टेडियम, खराडी, पुणे येथे ही स्पर्धा होणार आहे. हे स्टेडियम इनडोअर असुन एकाच वेळी ६ सामने येथे चालणार आहेत.
किती संघ होणार सहभागी?
मुलांचे १४४ तर मुलींचे ४६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यातील तब्बल ६७ संघ हे पुणे आणि पिंपरी चिंचवड सोडून उर्वरित पुणे जिल्ह्यातील आहेत.
कोण आहे आयोजक?
पुणे जिल्हा कबड्डी असोशियशनचे विद्यमान अध्यक्ष अजित पवार यांच्या सुचनेनुसार कारभैरव विकास प्रतिष्टानचे अध्यक्ष बापुसाहेब पठारे यांनी आयोजनाची धुरा हाती घेतली आहे. स्पर्धेच्या संयोजनात स्थानिक नगरसेवकांचेही सहकार्य होणार आहे.
स्पर्धेतून काय हाती लागणार?
या स्पर्धेतील संभाव्य २० खेळाडूंची निवड केली जाणार आहेत. त्यानंतर प्रशिक्षण शिबीरानंतर मुले आणि मुलींच्या अंतिम १२ खेळाडूंच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. हा संघ ३० आॅगस्ट ते २ सप्टेंबर २०१८ या काळात मुलुंड, मुंबई येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्याकडून खेळेल.
कोण आहे निवड समितीत?
या स्पर्धेसाठी कुमारगट निवड समितीत शैलेश मद्रासी, नितीन खाटपे, महेंद्र भांबुरे, शेखर सावंत आणि राजेंद्र पायगुडे तर मुलींच्या गटासाठी मोहिनी जोग, रंजना पोतेकर, नयना मोरे, प्रशांत सातव आणि सुवर्णा येनपुरे अशी असणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–आम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार???
–टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट
–टीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण