पुणे । यार्डी सॉफ्टवेअर संघाने प्रथम स्पोर्ट्स आयोजित पुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत परसिस्टंट संघावर ८ गडी राखून मात केली. याचबरोबर मर्स्क, इंडियन बँक, सिनेक्रॉन संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला.
पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या लढतीत परसिस्टंट संघाने सुधीर परांजपेच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १३९ धावा केल्या.
यार्डी सॉफ्टवेअर संघाने विजयी लक्ष्य २ गडींच्या मोबदल्यात १६.२ षटकांतच पूर्ण केले. यात अमित राडकरने ४७ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६२ धावा केल्या. दुसऱ्या लढतीत मर्स्क संघाने अॅटॉससिंटेल संघावर ३८ धावांनी मात केली. तिसऱ्या लढतीत इंडियन बँक संघाने सिनरझिप संघावर दोन गडी राखून विजय मिळवला.
यात सिनरझिपच्या राहुल पंडितने एकाच षटकात चार फलंदाजांना बाद केले. मात्र, अर्जुन शिंदने नाबाद ५८ धावा करून इंडियन बँक संघाला १८.३ षटकांत विजय मिळवून दिला. यानंतर सिनेक्रॉन संघाने एलटीआय संघावर सहा गडी राखून मात केली.
संक्षिप्त धावफलक : १) परसिस्टंट – २० षटकांत ६ बाद १३९ (सुधीर परांजपे नाबाद ६१, स्वरंग साठे २३, अमोल माने २१, पंकज एल. ३-२३, प्रमोद धावंडे १-१०) पराभूत वि. यार्डी सॉफ्टवेअर – १६.२ षटकांत २ बाद १४१ (अमित राडकर ६२, स्वप्नील घाटगे ३६, पार्थ शाह नाबाद २९, प्रशांत पानसरे १-१८).
२) मर्स्क – २० षटकांत सर्वबाद १६२ (वैभव महाडिक ४१, प्रसाद गिरकर ३३, दिनेश वाडकर २४, केतन कुलकर्णी ३-२३, शुभम जैन २-३०, संकेत त्रिवेदी २-१९) वि. वि. अॅटॉससिंटेल – २० षटकांत ९ बाद १२४ (शिवराज पिसाळ २७, केतन कुलकर्णी २१, अजित प्रधान २०, वेंकटेश अय्यर ४-१९, हितेश पांचाळ २-२, प्रसाद गिरकर २-३०).
३) सिनरझिप – २० षटकांत ८ बाद १३० (राहुल पंडिता ४५, आकाश बिहाडे ४०, सौरभकुमार २-९, अमित वाघमारे २-१९) पराभूत वि. इंडियन बँक – १८.३ षटकांत ८ बाद १३१ (अर्जुन शिंदे नाबाद ५८, विजय कोहली २५, राहुल पंडित ४-१३, नागमणी प्रसाद ३-३१).
४) एलटीआय – १९.३ षटकांत सर्वबाद १३८ (प्रतीक सिंग ३५, कुंतल देब २३, जमीर शेख २-१९, सौरभसिंग २-२) पराभूत वि. सिनेक्रॉन – १८ षटकांत ४ बाद १३९ (हार्दिक कोरी नाबाद ३७, संजयसिंग ३०, विवेक राठोड नाबाद २९, आयुष अवस्ती ३-२१).