पुणे । बार्कलेज, केपजेमिनी या संघांनी पुणे आयटी करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या लढतीत बार्कलेज संघाने कॉग्निझंट संघावर ५ गडी राखून मात केली.
कॉग्निझंट संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १२७ धावा केल्या. बार्कलेज संघाने विजयी लक्ष्य १९.३ षटकांत ५ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. यात कनिष्कसिंगने ६० चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ६६ धावा केल्या. नेहरू स्टेडियमवर झालेल्या लढतीत केपजेमिनी संघाने हरबिंगर संघावर ४४ धावांनी मात केली. केपजेमिनी संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५२ धावा केल्या. यानंतर हरबिंगर संघाला लक्ष्याचा पाठलाग करताना ९ बाद १०८ धावाच करता आल्या.
संक्षिप्त धावफलक – १) कॉग्निझंट – २० षटकांत ६ बाद १२७ (नमन शर्मा नाबाद ३८, पुनित करन नाबाद २५, नीतेश सपरे २१, सागर अगरवाल २-२७, विलक्षण दादवळ १-१२) पराभूत वि. बार्कलेज – १९.३ षटकांत ५ बाद १३१ (कनिष्कसिंग नाबाद ६६, अभिषेक श्रीवास्तव ३१, मिंहाज अली ३-१९. निपुन शर्मा १-३०).
२) केपजेमिनी – २० षटकांत ५ बाद १५२ (गिरिश बोरा ४१, विक्रांत बांगर ४०, अंकुश महासेब नाबाद २८, रोहन अनविकर ३-२४, वेंकटेश पुजारी १-३३, निखिल जगदाळे १-२७) वि. वि. हरबिंगर – २० षटकांत ९ बाद १०८ (हृषीकेश देशमुख २३, अश्विन मुत्तल १८, वेंकट रेड्डी २-१८, विक्रांत बांगर २-२८).
३) सीबीएसएल – २० षटकांत ५ बाद १३५ (अतिफ नाबाद ४०, आकाश अहिर ३५, निखिल जोशी २२, मोहित कम्पासी २-७) पराभूत वि. मर्स्क – १४.५ षटकांत २ बाद १३७ (वेंकटेश अय्यर नाबाद ५०, प्रसाद गिरकर नाबाद ३५, राघव त्रिवेदी ३१, अजय पाटील १-१८).
४) बीएनवाय मेलन – २० षटकांत ६ बाद १२४ (आशिष के. नाबाद ४१, मयुर भुजबळ २१, राजीव शेखर २-६, अमित उपाध्यय १-१६) वि. वि. स्प्रिंगर नेचर – २० षटकांत सर्वबाद १२३ (प्रमोद मोडक ३४, वैभव घनवट २०, राकेश हांडे २-१५, आशिष के. २-२२).
५) इन्फोसिस – २० षटकांत ७ बाद १७५ (संजय पुराणिक ३८, साईनाथ शिंदे ३६, सूरजकुमार ३-२७, सौमित्र छेपे २-३३) वि. वि. मास्टरकार्ड – २० षटकांत ८ बाद ९५ (ईशान शिंदे २९, मंदार एन. १६, रवी थापलियल ४-१०, सागर दुबे २-१५).
६) झेन्सर – २० षटकांत ८ बाद १५६ (भरत झव्हेरी २७, सिद्धार्थ जालन २६, ओंकारसिंग ३-१९, नविद श्रीनिवास २-१५) वि. वि. एचएसबीसी – २० षटकांत ९ बाद १२२ (धवल बडगुजर २१, शशांक सोलंकी २१, सिद्धार्थ ३-२९, मुझमिल खान २-२९, अमित दीक्षित २-१४).