क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज सातव्या दिवशी अ गटातील शेवटच्या साखळी लढती होत्या. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुणे पलानी टस्कर्स व आठव्या क्रमांकावर असलेल्या लातूर विजयनगारा विर्स यांच्यात लढत झाली. पुणे संघासाठी हा सामना महत्वाचा होता. टॉप 4 मध्ये आपला स्थान पक्का करण्यासाठी त्याना विजय आवश्यक होता.
पहिल्या 4 मिनिटांतच लातूर संघावर लोन पडत पुणे संघाने आघाडी मिळवली. भूषण तपकीर ने चतुरस्त्र चढाया करत चांगला खेळ केला. मध्यंतरापर्यत पुणे संघाकडे 31-10 अशी आघाडी घेतली होती. योगेश अक्षुमनीने 4 पकडी करत संघाला आघाडी मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली.
पुणे पलानी टस्कर्स संघाने 62-20 असा विजय मिळवत प्रमोशन व प्ले-ऑफस साठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला. पुणे पलानी टस्कर्स संघाकडून चढाईत भूषण तपकीर ने 13 व रोहित होडशील 12 गुण मिळवत उत्कृष्ट खेळाचा नमुना दाखवला. तर योगेश अक्षुमनी व ऋषिकेश पाटील प्रत्येकी 7-7 पकडी करत हाय फाय पूर्ण केला.
बेस्ट रेडर- भूषण तपकीर, पुणे पलानी टस्कर्स
बेस्ट डिफेंडर- योगेश अक्षुमनी, पुणे पलानी टस्कर्स
कबड्डी का कमाल- रोहित हडशील, पुणे पलानी टस्कर्स
(Pune Palani Tuskers team qualified for promotion and play-offs round)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दोन वर्षात तो टीम इंडियात दिसेल’, आयपीएल गाजवत असलेल्या युवा खेळाडूबाबत खुद्द हार्दिकचे भाकीत
गुजरातविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलला का नाही मिळाली गोलंदाजी? कर्णधार डेविड वॉर्नरन सांगितले कारण