पुणे – मुलींच्या १७ वर्षांखालील जिल्हा अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत पुण्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आज झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत कोल्हापूरने त्यांचा अगदीच एकतर्फी झालेल्या लढतीत ४-० असा पराभव केला.
नाशिक येथील मीनाताई ठाकरे मैदानावर संपन्न झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मध्यंतरालाच कोल्हापूरने २-० अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर उत्तरार्धात त्यांनी आणखी दोन गोल नोंदवून मोठ्या विजयासह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
स्पर्धेत अपराजित राहिलेल्या पुण्याच्या मुलींनी साखळीतील सर्व सामने जिंकून अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यांना विजेतेपदाच्या लढतीत कोल्हापूरच्या मुलींचे आव्हान पेलता आले नाही. कोल्हापूरच्या मुलींनी उपांत्य फेरीत बलाढ्य मुंबईचाही पराभव करून आपले नाणे खणखणीत वाजवले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आSSS! …अन् स्टँड्समधून मुंबईला चीयर करणारी सारा तेंडुलकर मोठ्याने किंचाळली, रिऍक्शन व्हायरल
मुंबईचा दहावा पराभव, पण ‘या’ खेळाडूने स्वत:ला केले सिद्ध; दाखवला चमकदार अष्टपैलू खेळ