लखनऊ ।
स्टार स्पोर्ट्स प्रिमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत लखनऊ येथील सत्रात खेळताना पुणे सेव्हन एसेस संघाकडून खेळताना ऋतुपर्णा दास, चिराग शेट्टी, हेंद्र सेतीवान यांनी कामगिरी करत चमक दाखवली. पुणे सेव्हन एसेस संघाने या सर्वांच्या जोरावर आपल्या पहिल्याच लढतीत विजय आघाडी घेतली.
लखनऊ येथे सुरू असलेल्या लढतीत पुणे सेव्हन एसेस संघाने आक्रमक सुरुवात केली.त्यांच्या चिराग शेट्टी व हेंद्र सेतीवान जोडीने मुंबई रॉकेट्सच्या किम जी युंग व किम सा रांग जोडीला 2-1 अशा फरकाने नमविले.चिराग व हेंद्र जोडीला पहिला गेम 14-15 असा गमवावा लागला.पण, दुसऱ्या गेममध्ये 15-5 असा विजय मिळवत सामना बरोबरीत आणला. शेवटच्या गेममध्ये देखील त्यांनी 15-6 अशी चमक दाखवली व विजय नोंदवला.
महिला एकेरीत श्रीयांशी परदेसी व ऋतुपर्णा दास यामध्ये चांगली चुरस पहायला मिळाली.श्रीयांशी परदेसीने पहिला गेम 15-11 असा जिंकत आघाडी घेतली.पण, दुसऱ्या गेममध्ये ऋतुपर्णा दासने पुनरागमन करत 15-9 अशी बाजी मारत सामना बरोबरीत आणला.पण, पुणे सेव्हन एसेसच्या ऋतुपर्णा दासने निर्णायक गेम 15-9 असा जिंकत सामन्यात विजय मिळवला.
पुरुष एकेरीच्या सामन्यात पुणे सेव्हन एसेसच्या लोह किआन येवने भारताच्या पारुपल्ली कश्यपवर 15-7, 15-14 असा विजय मिळवला.सामन्यातील पहिला गेम 15-7 असा जिंकत येव याने चमक दाखवली. दुसऱ्या गेममध्ये येव याला कश्यपने आव्हान दिले पण, लोह किआन येवला विजय मिळवण्यात यश मिळाले.