---Advertisement---

पुण्यात होणार आयपीएलचे हे सामने

---Advertisement---

पुणे। आयपीएल २०१८ मध्ये पुण्यात फक्त बाद फेरीचे दोन सामने होणार होते. पण आता पुणे आयपीएलमधील एका संघाचे यजमानपद भूषवणार आहे.

दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला तामिळनाडूत कावेरी नदी वाद पेटला असल्याने चेन्नईतील आपले बस्थान हलवावे लागले आहे. त्यामुळे आता चेन्नईचे नवीन घरचे मैदान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असेल.

याबद्दल आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, “चेन्नईतील सामने हलवावे लागले आहेत. कारण पोलिसांनी आम्हाला सांगितले की ते अशा गोंधळाच्या परिस्थिती सुरक्षा पुरवू शकत नाहीत. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे चेन्नईतील सामने पुण्याला हलवण्यात आले आहेत, “

चेन्नईत कालच २ वर्षांनंतर पहिल्यांदा क्रिकेटचा सामना झाला होता. त्यामुळे ही बाब चेन्नई सुपर किंग्जच्या संघासाठी आणि चाहत्यांसाठी निराश करणारी आहे. काल झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यात क्षेत्ररक्षकावर कावेरी आंदोलकांनी बुटे फेकली होती.

ही बुटे चेन्नईच्या रवींद्र जडेजा आणि फाफ डुप्लेसिसच्या दिशेने आली. ही घटना कोलकाता संघाची फलंदाजी चालू असताना ८ व्या षटकात घडली. जडेजा क्षेत्ररक्षणासाठी लॉन्गऑनला उभा असताना त्याच्या दिशेने बूट आला. तसेच बाउंड्रीच्या दोरीच्या इथे आलेला बूट फाफ डुप्लेसिस आणि लुंगी इंगिडीने चुकवला.

या घटनेनंतरच चेन्नईतील सामने हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चेन्नईच्या संघाच्या यजमानपदासाठी विशाखापट्टनम, पुणे, राजकोट आणि त्रिवेंद्रम हे ४ पर्याय होते. पण यातून पुण्याची निवड करण्यात आली आहे.

चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आयपीएलचे मागील दोन मोसम रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून खेळला असल्याने पुण्यातील परिस्थितीशी परिचित आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघाचे यजमानपद पुण्याला देण्यात आले आहे.

आयपीएलच्या सूत्रांनी विशाखापट्टणम ऐवजी पुण्याला चेन्नईचे यजमानपद दिल्याचे आणखी एक कारण सांगितले आहे, ते म्हणाले, “विशाखापट्टनमवरून थेट विमान प्रवास खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. जर संघाला इंदोरला जायचे असेल तर त्यांना दिल्लीच्या मार्गाने जावे लागेल. पुण्यातून प्रवासाचे बरेच पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे आम्ही चेन्नईतील सामने पुण्यात हलवण्याचा निर्णय घेतला.”

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनीही चेन्नईचे सामने घेण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment