---Advertisement---

३३वर्षानंतर पुणे शहरात राष्ट्रीय कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

On: शुक्रवार, मे 19, 2017 11:31 AM
---Advertisement---

पुणे, मे १६: पुण्यात ३ भव्य टेनिस स्पर्धांना २० मेपासून सुरुवात होत आहे. यामध्ये १२व्या रमेश देसाई मेमोरियल राष्ट्रीय (१६ वर्षाखालील )कुमार टेनिस स्पर्धा,  एचसीएल आशियाई (१८ वर्षाखालील) कुमार बी १ आयटीएफ टेनिस स्पर्धा आणि आशियाई एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धांचा समावेश आहे.

पुणे शहरांत ३३ वर्षांच्या अंतरानंतर राष्ट्रीय कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन होत असल्याचे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले. याआधी १९८४मध्ये रावळगाव कुमार टेनिस स्पर्धेचे शहरांत आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या संलग्नतेने एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे.

१२व्या रमेश देसाई मेमोरियल राष्ट्रीय (१६ वर्षाखालील ) कुमार टेनिस स्पर्धेसाठी मुले व मुलींच्या गटात देशभरांतून  २०० हुन अधिक खेळाडू आपला सहभाग नोंदवतील अशी आशा आहे.  तसेच, पहिल्या फेरीपासूनच ३लाख हुन अधिक रकमेची शिष्यवृत्ती खेळाडूंना प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये १६ वर्षाखालील मुलांच्या गटाचा मुख्य फेरीचा ड्रॉ ६४ चा, तर मुलींच्या गटाचा ड्रॉ ४८ खेळाडूंचा असणार असल्याचे अय्यर यांनी नमूद केले.

तसेच, १२ व १६ वर्षाखालील गटातील हि स्पर्धा एआयटीएचे माजी सहसचिव आणि एमएसएलटीएचे माजी मानद सचिव रमेश देसाई यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित करण्यात येते. ही स्पर्धा रमेश देसाई यांच्या आदराप्रित्यर्थ भरविण्यात येत असून या स्पर्धेच्या माध्यमातून कुमार पातळीवर टेनिसच्या प्रचारासाठी नक्कीच मदत होईल,  असे एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा यांनी सांगितले.

तसेच,  १६ वर्षाखालील गटांतील ही स्पर्धा पुण्यात पहिल्यांदाच होत असून १२ वर्षाखालील गटांतील टेनिस स्पर्धा मुंबई येथे एमएसएलटीए कॉम्प्लेक्स येथे होणार आहे.

स्पर्धेसाठी आयटीएफ व्हाईट बॅच ऑफिशिअल वैशाली शेकटकर यांची सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने शनिवार, दि. २० मे आणि रविवार दि. २१ मे रोजी खेळविण्यात येणार असून मुख्य फेरीस सोमवार दि. २२ मे पासून प्रारंभ होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment