आज आयपीएलमध्ये महारष्ट्रातील दोन संघांची लढत होणार असून, मुबंई आपला दबदबा कायम राखाण्याचा प्रयत्न करेल तर पुण्याचे लक्ष आपल्या घरच्या मैदानावर चांगला खेळ करण्याचे असेल. मागील वर्षाच्या आयपीलमध्ये पुण्यात झालेल्या सामान्यमध्ये मुंबईने पुण्याला नमवले तर मुंबईत झालेल्या सामान्यमध्ये पुण्याने बाजी मारली होती.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला या वर्षी पुण्याने सर्वाधिक किंमत देऊन १४.५ कोटीला विकत घेतले, आता त्याच्याकडून पुण्याला खूप अपेक्षा असणं निश्चित आहे. तसेच पुण्याचा नवीन कर्णधार स्टीवन स्मिथ ही चांगल्या लईत आहे. मुंबईने ही बिग बॅश मध्ये चांगली गोलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियाचा माझी स्टार खेळाडू जॉनसॅनला २ कोटी मध्ये आपल्या संघात घेतले आहे.
आता या दोनी संघाला चांगली सुरुवात करणे गरजेचे आहे, मुबंईने दोन वर्षापूर्वी चांगली सुरुवात न मिळून सुद्धा प्लेऑफ पर्यंतची मजल मारली होती. पण पुण्याला मात्र मागील वर्षी चांगली सुरुवात मिळून सुद्धा पुढे चांगला खेळ करता आता नाही. आता बघूयात की महाराष्ट्रातील कोणता संघ आयपीएलचा श्रीगणेशा विजयाने करतो.