---Advertisement---

WMPL 2025 च्या फायनलिस्ट ठरल्या! पुणे आणि सोलापूर दरम्यान ट्रॉफीसाठी द्वंद्व

On: बुधवार, जून 11, 2025 5:04 PM
---Advertisement---

वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग म्हणजेच डब्ल्यूएमपीएल या स्पर्धेत बुधवारी (11 जून) सकाळी पुणे वॉरियर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स हा सामना खेळला गेला. या सामन्यात पुणे वॉरियर्सने 6 विकेट्स राखून विजय मिळवला.‌ त्यांचा हा सलग पाचवा विजय ठरला. त्यांच्या विजयासोबतच अंतिम सामन्यात दाखल झालेले संघ देखील निश्चित झाले. पहिल्यांदाच होत असलेल्या या स्पर्धेचा पहिला अंतिम सामना पुणे वॉरियर्स विरुद्ध सोलापूर स्मॅशर्स असा होईल.

सकाळच्या सत्रात झालेल्या, पुणे वॉरियर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स या सामन्यात, पुणे वॉरियर्सने सलग पाचवा विजय नोंदवला. स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रत्नागिरी जे संघासाठी हा सामना ‘करा अथवा मरा’ अशा स्वरूपाचा होता. मात्र, पुणे वॉरियर्सने रत्नागिरीचे आव्हान मोडीत काढले. पुणे संघाचा हा सलग पाचवा विजय तर रत्नागिरीचा चौथा पराभव ठरला. दुसऱ्या बाजूला आतापर्यंत चार सामने खेळलेल्या, सोलापूर स्मॅशर्स संघाने तीन विजय संपादन केले आहेत.

स्पर्धेत साखळी फेरीचे अद्याप तीन सामने खेळायचे बाकी आहेत. यामध्ये सोलापूर स्मॅशर्स विरुद्ध रायगड रॉयल्स, सोलापूर स्मॅशर्स विरुद्ध पुणे वॉरियर्स व रत्नागिरी जेट्स विरुद्ध रायगड रॉयल्स असे सामने होतील. मात्र, या सामन्यांच्या निकालाचा अंतिम सामन्यावर काहीही परिणाम होणार नाही. कारण, रत्नागिरी व रायगड हे दोन्ही संघ तीन विजयांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत.

भारतीय क्रिकेटमध्ये अशाप्रकारे महिलांची टी20 लीग आयोजित करणारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ही पहिली आणि एकमेव राज्य संघटना आहे. आतापर्यंत कमालीच्या यशस्वी झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 14 जून रोजी सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल. गहूंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला जाईल. एमसीए अध्यक्ष आ. रोहित पवार यांनी या सामन्यासाठी देखील चाहत्यांना कोणत्याही तिकिटाची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---