2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने खेळण्यास नकार दिला आहे. त्यांच्या जागी आयसीसीने (ICC) स्कॉटलंड संघाला संधी दिली आहे. दरम्यान, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नकवी (Mohsin Naqvi) यांच्या एका वक्तव्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ माजली आहे.
बांगलादेशने माघार घेतल्यानंतर आता पाकिस्ताननेही नखरे दाखवण्यास सुरुवात केली आहे. 24 जानेवारी रोजी पीसीबी प्रमुख मोहसिन नकवी यांनी पत्रकार परिषदेत एक मोठे विधान केले. नकवी म्हणाले की, जर पाकिस्तान सरकारने आम्हाला वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचा आदेश दिला, तर आयसीसीला 22 वा संघ शोधावा लागेल. हा संपूर्ण निर्णय पाकिस्तान सरकारचा असेल. सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान परदेश दौऱ्यावर आहेत, ते परतल्यानंतरच पाकिस्तान या विश्वचषकात खेळणार की नाही, हे स्पष्ट होईल.
बांगलादेश बाहेर पडल्यावर आता पाकिस्ताननेही आपली सहभाग निश्चित नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान सरकारचा निर्णय अंतिम असेल, असे सांगून त्यांनी या स्पर्धेबाबत संभ्रम निर्माण केला आहे.






