पुणे | ६३वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यावर्षी पुण्यात पार पडणार आहे. पुण्यातील श्री शिवछत्रती क्रीडानगरी, बालेवाडी, पुणे येथे २ ते ७ जानेवारी २०१९ दरम्यान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे माती आणि गादी अशा दोन्ही प्रकारात ही स्पर्धा होणार आहे.
यापुर्वी २०१७मध्ये पुण्यातील भुगाव येथे ही स्पर्धा झाली होती तर गेल्यावर्षी जालना येथे ही स्पर्धा पार पडली होती. तेव्हा बाला रफीक शेखने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते.
पुणे जिल्ह्याला तब्बल १४ व्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे.
ही स्पर्धा सलग तीन वेळा जिंकण्याची कामगिरी आजपर्यंत केवळ २ मल्लांना करता आली आहे. २०१४ ते २०१६ असे सलग तीन वेळा जळगावचा विजय चौधरी तर २०११ ते २०१३ असे सलग तीन वर्ष नरसिंग यादव महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकलेली आहे.