महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2023) च्या पहिल्या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने कोल्हापूर टस्कर्सचा 8 गडी राखून पराभव केला. गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीनंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड व पवन शाह यांनी झळकावलेली आक्रमक अर्धशतके पुणेरी बाप्पा संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
https://www.instagram.com/p/CthX8DbvukW/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
गहुंजे येथील एमसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पुणेरी बाप्पाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोल्हापूर संघासाठी कर्णधार केदार जाधव व अंकित बावणे ही सलामी जोडी मैदानात उतरली. त्यांनी 8 षटकात 65 धावा कुटल्या. रोहन दामलेने केदारला 25 धावांवर बाद करत पुणे संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अंकित व नौशाद शेख ही जोडी जमली. त्यांनी देखील अर्धशतकी भागीदारी केली. अंकितने 72 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर कोल्हापूर संघाची गाडी घसरली. पियुष साळवी व सचिन भोसले यांनी प्रत्येकी तीन बळी घेत कोल्हापूरचा डाव 144 पर्यंत रोखला.
या धावांचा पाठलाग करताना पुणे संघाला कर्णधार ऋतुराज गायकवाड व पवन शाह या जोडीने तुफानी सुरुवात दिली. दोघांनी 10 षटकात 110 धावा झोडल्या. ऋतुराजने 27 चेंडूवर 64 धावा केल्या. पवन विजयासाठी 3 धावा शिल्लक असताना 57 धावा करत बाद झाला. त्यानंतर सुरज शिंदे व यश क्षिरसागर यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. ऋतुराजला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
(Puneri Bappa Beat Kolhapur Tuskers In MPL 2023 Opener Ruturaj Gaikwad Hits Fifty)
महत्वाच्या बातम्या-
रैनासोबत घाणेरडी चेष्टा! LPLसाठी केली नव्हती नोंदणी, तरीही लिलावात आलं नाव; पण…
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा