एमपीएल अर्थातच महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेतील एलिमिनेटर सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स संघात खेळला गेला. या सामन्यात पुणेरी बाप्पाने नाशिकला 3 विकेट्सने पराभवाचा धक्का देत क्वालिफायर 2 सामन्यात प्रवेश केला. बुधवारी (दि. 28 जून) पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स संघात क्वालिफायर 2 सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी उभय संघात 7 वाजता नाणेफेक होईल. हा सामना जिंकून दोन्ही संघ अंतिम सामन्यात रत्नागिरी जेट्स संघाविरुद्ध दोन हात करण्याचा प्रयत्न करतील.
स्पर्धेतील कामगिरी
पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स संघांची स्पर्धेतील कामगिरी पाहिली, तर त्यावरून कोल्हापूरचं पारडं जड दिसतंय. कारण, कोल्हापूरने साखळी फेरीत खेळलेल्या 5 सामन्यांपैकी 4 सामन्यात विजय मिळवला होता, तर 1 सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. तसेच, त्यांनी साखळी फेरीचा शेवट गुणतालिकेत 8 गुण मिळवत दुसऱ्या स्थानाने केला होता.
दुसरीकडे, पुणेरी बाप्पा संघाने साखळी फेरीत खेळलेल्या 5 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय मिळवला होता, तर 3 सामन्यात पुण्याला हार पत्करावी लागली होती. पुण्याने साखळी फेरीचा शेवट 4 गुणांसह चौथ्या स्थानी केला होता. अशात क्वालिफायर दोन सामन्यात पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स (Puneri Bappa vs Kolhapur Tuskers) आमने-सामने असणार आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.
कुठे पाहता येईल सामना?
पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स संघातील क्वालिफायर 2 (Qualifier 2) सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर मोफत पाहता येणार आहे. तसेच, हा सामना डिजीटली पाहण्यासाठी फॅनकोड या ऍपचा वापर करावा लागेल. तसेच, सामन्याची धावसंख्या फॅनकोड, स्पोर्ट्स टायगर या वेबसाईटवर पाहता येईल. (Puneri bappa vs kolhapur tuskers qualifier 2 mpl 2023)
उभय संघ
कोल्हापूर टस्कर्स-
केदार जाधव (कर्णधार), नौशाद शेख, कीर्तीराज वाडेकर, मनोज यादव, विद्या तिवारी, अत्मन पोरे, अक्षर दरेकर, श्रेयंश चव्हाण, सिद्धार्थ म्हात्रे, तरणजीत ढिल्लन, निहाल तुस्माड, रवी चौधरी, अंकित बावणे, सचिन धस, निखिल मदस, साहिल औताडे
पुणेरी बाप्पा-
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रोहन दामले, प्रशांत कोरे, अद्वय शिधाये, अझहर अन्सारी, शुभंकर हर्डीकर, वैभव चौघुले, रोशन वाघसरे, पियुष साळवी, आदित्य डवरे, सौरभ दिघे, शुभम कोठारी, सोहन साळुंखे, सोहन साळवी, साळुंखे. भोसले, अभिमन्यू जाधव, यश क्षीरसागर, पवन शहा, श्रीपाद निंबाळकर, हर्ष संघवी, दिग्विजय पाटील, अजय बोरुडे, आदर्श बोथरा, भूषण नावंदे, कुंश दीक्षित, हर्ष ओसवाल, सूरज शिंदे.
महत्वाच्या बातम्या-
आयसीसीने वर्ल्डकप 2023साठी निवडली 10 मैदानं, फक्त ‘हे’ ग्राऊंड सोडून विराटने 9 ठिकाणी झळकावलंय शतक
नाद करा पण पुण्याचा कुठं! एलिमिनेटर सामन्यात ‘बाप्पा’चा दणदणीत विजय, अद्वयमुळे ‘क्वालिफायर 2’मध्ये एन्ट्री