पुणे: प्रो कबड्डी सिझन 6 साठी पुणेरी पलटण पुन्हा नव्या जोमाने आपल्या घरच्या मैदानावर खेळण्यास सज्ज झाली आहे. पलटणचे सिजन 6 मधील सामने गेल्यावर्षी प्रमाणे श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉमप्लेक्स, म्हाळुंगे, बालेवाडी येथे होणार आहेत. 18 ते 24 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात होणाऱ्या पुणे लेग मधील सामन्यांसाठी तिकीटांची ऑनलाईन विक्री सुरू झाली आहे.
तिकीटांची विक्री बुक माय शो आणि पुणेरी पलटणच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे, बालेवाडी येथे मॅचच्या दोन दिवस अगोदर ऑफलाइन तिकीट विक्री काउंटर सुरू होणार आहे. कब्बडी रसिक मोठ्या संख्येने आपल्या घरच्या संघाला पाठींबा देतील अशी अपेक्षा व्यवस्थापनाने व्यक्त आहे. पुणेरी पलटण घरच्या मैदानावरील आपला पहिला सामना 18 ऑक्टोबर गुजरात फॉरचुन सोबत खेळणार आहे.
पुणेरी पलटणचे सीईओ कैलाश कंडपाल म्हणाले की “आमचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे, आणि सालाबादप्रमाणे लोक मैदानात येऊन आपल्या संघाला पाठींबा देत आहेत. पुणेरी पलटण हा त्यांचाच संघ आणि आणि आम्ही सर्व जण एक परिवार आहोत. पुणेरी पलटणचे गेल्यावर्षीचे सर्व सामने हाउसफुल होते, आम्हाला सातत्याने दिलेल्या या प्रेमाविषयी मी केवळ आपले आभार मानू शकतो”. अश्या शब्दात कंडपाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
चेन्नई येथे उत्कंठापणाला लावणाऱ्या प्रो कबड्डी सिझन 6 ची सुरूवात 7 ऑक्टोबर 2018 पासून होणार आहे. पुणेरी पलटणचे घरच्या मैदानावरील सामने हे चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहेत. सोशल मिडियावर पलटणला संघाला मोठा चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–रवी शास्त्रींना प्रशिक्षक पदावरुन हटवण्याची या माजी भारतीय क्रिकेटपटूने केली मागणी
–एशिया कप २०१८: भारत विरुद्ध हाँग काँग सामन्याबद्दल सर्वकाही
–एशिया कप २०१८: स्पर्धेबाहेर होणारा श्रीलंका ठरला पहिला संघ; अफगाणिस्तानने दिला पराभवाचा धक्का