---Advertisement---

‘महाराष्ट्र डर्बी’ पलटनच्या नावे! यु मुंबाचा पाडला फडशा

On: गुरूवार, जानेवारी 13, 2022 9:34 PM
ASLAM
---Advertisement---

बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ५२ व्या सामन्यात महाराष्ट्रातील दोन संघ भिडले. यु मुंबा विरुद्ध पुणेरी पलटन अशा झालेल्या सामन्यात नितीन तोमरच्या नेतृत्वातील पुणेरी पलटण संघाने ४२-२३ अशी बाजी मारली.

सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून पुणे संघाने सामन्यात आघाडी घेतली होती. कर्णधार तोमर व अस्लम इनामदार यांनी सातत्याने गुण घेत संघाला आघाडीवर ठेवले. पहिल्या हाफच्या अखेरीस पुणे संघाकडे १८-१० अशी आघाडी होती.

दुसऱ्या हाफमध्ये बलदेव, विशाल व मोहित गोयतने गुण घेत आघाडी जवळपास दुप्पट केली. पुण्याच्या खेळाडूने अखेरपर्यंत मुंबईच्या संघाला डोकेवर न काढू देता ४२-२३ असा दणदणीत विजय साजरा केला.

तत्पूर्वी, दिवसातील पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने तमिल थलाइवाजला ३७-२८ असे पराभूत केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---