औरंगाबाद। सर्वांपर्यंत युवांचे टॅलेंट पोचावे यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या पुणेरी पलटणतर्फे औरंगाबादच्या प्रोझोने मॉल येथे बोल कबड्डी या आय पी अंतर्गत आंतर क्लब कबड्डी स्पधेचे आयोजन केले. ही चॅम्पपियनशिप औरंगाबाद कबड्डी फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. २४ संघांनी सहभाग घेत, चॅम्पियनशिपला जबरदस्त प्रतिसाद दिला. २४ संघांपैकी २ मुलींदे संघदेखील स्पर्धेत सहभागी झाले होते. ७ औरंगाबाद बाहेरुन आलेले संघ देखील सहभागी झाले होते.
या स्पर्धेतील विजेते निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट ठरले, ज्यांना १५,००० रुपये व करंडकाने गौरवविण्यात आले. उपविजेता साई क्रिडामंडळ (परभणी) ठरले, ज्यांना १०,००० रुपये व एक चषक देण्यात आले. फायनल स्कोर होता ३६-२५. सुरेश जाधव (निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट) हा उत्कृष्ट चढाईपटू ठरला व अल्केश चवाण (निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट) हा उत्कृष्ट बचावपटू ठरला.
या निमित्ताने इमशुअरकोट स्पोर्ट्सचे सीईओ कैलाश कांडपाल म्हणाले की, “या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्रातील आपल्या चाहत्यांशी संपर्क साधायचा आहे आणि महाराष्ट्रातील प्रतिभावान कबड्डीपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे आहे. या युवा खेळाडूंनी दाखविलेल्या उस्फुर्ततेने आणि कौशल्याने आम्हाला आनंद झाला. पुणेरी पलटण प्रती दाखववलेल्या प्रेम व समर्थनासाठी आम्ही औरंगाबादचे आभार मानतो.”
या स्पर्धेत सहभागी संघ आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी ह्या पुढाकाराचे खूप कौतुक केले. ह्या खेळाडूंनी अशा प्रकारच्या आणखी स्पर्धांमध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली. अनेक संख्येमध्ये दर्शक देखील उपस्थित होते. दर्शक त्यांच्या आवडीच्या संघांला प्रोत्साहित करत होते आणि खेळाडूंचे मनोबल वाढवत होते. ही चॅम्पियनशिप यशस्वी ठरली.
पुणेरी पलटणच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील टॅलेंट असलेले खेळाडू समोर येण्यास मदत होणार आहे. उत्साह आणि अतिशय कष्टाने पुणेरी पलटणने आपला प्रवास सुरू केला आहे, प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमात पुणेरी पलटणने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. टीम आपल्या शहरातून – पुण्यातून १४ सप्टेंबर २०१९ रोजी ते २० सप्टेंबर २०१९ रोजीपर्यंत मॅचेस खेळेल. श्री शिव छत्रपती स्पोर्टस् कॉम्प्लेक्स महालुंग, बालेवाडी येथे या स्पर्धा होतील.