हैद्राबाद, 3 डिसेंबर 2022: मशाल स्पोर्टस् यांच्या वतीने आयोजित नवव्या विवो प्रो कबड्डी लीग स्पर्धेत आकाश शिंदे (16) आणि पंकज मोहिते (11) यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पुणेरी पलटण संघाने दबंग दिल्ली संघाचा 47-44 असा पराभव केला आणि गुणतलिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.
गचीबावली इनडोअर स्टेडियमवर सूरू असलेल्या या स्पर्धेत प्ले ऑफ मध्ये आधीच आपले स्थान निश्चित केलेल्या पुणेरी पलटण संघाने जयपुर संघाला पहिल्या स्थानावरून हटविले. पुणेरी पलटण 74गुणांसह अव्वल स्थानी असून जयपुर संघ 69गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या विजयासह पुणेरी पलटण संघाने 20सामन्यांत 13विजय मिळवला, तर दिल्ली संघाचा हा 10पराभव ठरला. दिल्ली संघाकडून नवीन कुमारने 16 गुणांची कमाई केली.
दिल्ली ने सामन्यात सुरेख सुरुवात करत पहिल्या चार मिनीटात 6-2 अशी आघाडी घेतली. आशू ने सुरेख चढाई करत पुणेरी पलटणच्या संकेतला बाद करून संघाला सुपर टकल स्थितीत नेले. त्यानंतर दिल्ली संघाने आपला दबाव कायम ठेवत पुणेरी पलटण संघावर लोण चढवला व सामन्यात 13-7 अशी आघाडी मिळवली. आकाश ने 11व्या मिनिटाला मल्टी प्वाइंट रेड करत ही आघाडी 9-14 ने कमी केली. त्यानंतर नवीनने पुन्हा चढाई करत दोन गुणांसह ही आघाडी 7 गुणांच्या फरकाने वाढवली. पुणेरी पलटण संघाने जोरदार कमबॅक करत पुन्हा ही आघाडी 14-16 अशा फरकाने कमी केली.
पुणेरी पलटण संघाने दिल्लीवर पहिला लोण चढवत सामन्यात 21-20 अशी स्थिती निर्माण केली व पूर्वार्धात एक गुणाच्या फरकने आघाडी घेतली.उत्तरार्धात पुणेरी पलटण संघाने शानदार खेळाचे प्रदर्शन करत 25-22 अशा आघाडीसह दिल्ली संघावर आणखी एक लोण चढवला आणि सामन्यात 30-24ने आपली आघाडी वाढवली. त्यानंतर पुणेरी पलटणच्या आकाशने अफलातून खेळी करत दिल्लीवर वर्चस्व गाजवले. तर, दिल्लीच्या नवीनने 900 रेड गुण पूर्ण केले. सुपर टेकलमध्ये पंकजने नवीन आणि रवीला बाद केले आणि दिल्ली संघावर आणखी एक लोण चढवला आणि 41-29 अशी आघाडी मिळवली.
अखेर दिल्ली संघाने 4गुण प्राप्त करून ही आघाडी 9गुणांच्या फरकावर आणली. नवीन ने पुढच्या चढाईत सोमवीरला बाद केले आणि सामन्यात 42-46 अशी स्थिती निर्माण करुन दिली. सामना संपण्यास दोनच मिनिटे शिल्लक असताना नवीनने गुण मिळवले. परंतु पुणेरी पलटण संघाने आपली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत दिल्ली संघावर तीन गुणांच्या फरकाने विजय मिळवला. (Puneri Paltan topped the Vivo Pro Kabaddi League after defeating Dabang Delhi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीसीबी आशिया चषकातून माघार घेतानाही मागे पुढे पाहणार नाही! रमीझ राजांचे मोठे विधान
पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत 10 संघांचा समावेश