---Advertisement---

‘पुणेरी पलटण’ने ‘यू मुंबा’ना दिली शिकस्त, अवघ्या २ गुणांच्या फरकाने सामन्यात मारली बाजी

On: बुधवार, फेब्रुवारी 2, 2022 9:55 PM
Pune-Mumbai-Kabaddi
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या दिवशी (२ फेब्रुवारी) प्रो कबड्डीचा ८९ वा सामना पुणेरी पलटण आणि यू मुंबा यांच्यात झाला. शेवटपर्यंत धाकधूक वाढवलेल्या या सामन्यात पुणेरी पलटणने २ गुणांनी बाजी मारली. त्यांनी ३६-३४ च्या फरकाने हा सामना जिंकला आहे. 

तत्पूर्वी प्रो कबड्डीचा ८८ वा सामना पटणा पायरेट्स आणि यूपी योद्धा संघात झाला. पटणा पायरेट्सने ३७-३५ च्या अंतराने हा सामना जिंकला. हा पटणा पायरेट्सचा हंगामातील नववा विजय होता. पहिल्या हाफपर्यंतही पटणा पायरेट्सचा संघच आघाडीवर होता. त्यांनी २०-१५ च्या फरकाने आघाडी घेतली होती. पुढे यूपी योद्धांनी सामन्यात पुनरागमन करण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु काही अंतराने त्यांना सामना गमवावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘पटणा पायरेट्स’चा पुन्हा दरारा, ‘यूपी योद्धां’ना ३७-३५ने धूळ चारत नोंदवला नववा विजय

ब्रेकिंग! भारतीय संघात कोरोनाचा स्फोट? वेस्ट इंडिज मालिकेपूर्वीच ‘हे’ दिग्गज खेळाडू बाधित

जिथे आयुष्याला डाग लागला, तिथेच तो डाग मिटवायला येतोय परत!! लिलावातील संधीवरून श्रीसंत भावुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---