पुणे। डझनभर गोलच्या सामन्यात निलिशा, कोयल आणि राशी यांनी नोंदवलेली हॅट्रिक पीडीएफए फुटबॉल लीगच्या आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरली. पुणेरी वॉरियर्सने प्रीमियर एफए विरुद्धचा हा सामना १२-० असा जिंकला.
एसएसपीएमएसच्या मैदानावर झालेल्या महिला लीगमधील गट सीमधील सामन्यात पुणेरी वॉरियर्सने एकामागून एक १२ गोल करत प्रीमियर एफएचा धुव्वा उडवला. सामन्याच्या सहाव्या मिनिटासला जिआन्ना मुथु हिने पहिला गोल नोंदवला. त्यानंतर ५९व्या मिनिटाला कोयल मजुमदार हिने अखेरचा १२वा गोल नोंदवला. विशेष म्हणजे या सामन्यात त्यांच्याकडून तीन हॅट्रिक नोंदवण्यात आल्या. निवलिशा संकेत हिने ४, ३८, ५७व्या, राशी वर्माने १५, ४९ आणि ५६व्या मिनिटाला गोल केले, तर कोयल मजुमदार हिने ३५, ३९, ४८ आणि ५९व्या मिनिटाला हॅट्रिकसह चार गोल केले. त्यांचा अन्य एक गोल किर्ती गोसावी हिने २१व्या मिनिटाला केला.
पुणेरी वॉरियर्सप्रमाणे अस्पायर संघानेही आपली आगेकूच कायम राखली. त्यांनी अ गटात दिएगो ज्युनिएर्सचा ५-० असा पराभव केला. वैष्णवी बराटे आणि निहारिका पाटिल यांनी प्रत्येकी दोन, तर सेजल धनवडे हिने एक गोल केला.
१६ वर्षांखालील गटात झालेल्या सामन्यात उत्कर्ष क्रीडा मंच संघानेही मोठ्या विजयाची नोंद करकताना ब्लॅक हॉक्सला ५-० असे हरवले. त्यांच्याकडून कौशल वैद्य आणि अनिकेत सिंग यांनी प्रत्येकी दोन, तर अनिकेत अवघडे याने एक गोल केला.
निकाल –
सप महिवद्यालय मैदान- तृतीय श्रेणी
गट अ – नव महाराष्ट्र: 2 (सुमित जोरकर 30वा) वि.वि. उमेश पदुमले 59 वा) बीटी अखिल भुसारी कॉलनी : 1 (टीमोथी कामी 25वा)
गट अ – परशुरामियन्स एस.सी. ‘बी’: ० बरोबरी वि. गॅलॅक्टिक वॉरियर्स: ०
एसएसपीएमएस मैदान- महिला लिग
गट सी – पुणेरी वॉरियर्स: 12 (जियान्ना मुथू 6वे, निलिशा संकेत 4थे, 38वे, 57वे, राशी वर्मा 15वे, 49वे, 56वे, कीर्ती गोसावी 21वे, कोयल मजुमदार 35वे, 39वे, 48वे, एफएटीएमआय 35वे, 39वे, 48वे मिनिट) वि.वि. प्रिमियर एफए ०
गट सी – स्निग्मय एफसी : 1 (अॅलिशन विंटल 50वे ) वि.वि. स्टेप ओव्हर एफए: 0
गट अ – अस्पायर एफसी 5 (वैष्णवी बराटे 2रे, 38वे, सेजल धनावडे 10वे, निहारिका पाटील 23वे, 26वे) वि.वि. दिएगो ज्युनियर्स: 0
१६ वर्षांखालील युवा-
गट सी – उत्कर्ष क्रीडा मंच : 5 (कौशल वैद्य 11वे, 17वे ,अनिकेत अवघडे 25वे, अनिकेत सिंग 40वे, 50वे) वि.वि. ब्लॅक हॉक्स एफसी : 0
गट सी : यंग स्टेप्स: 1 (संतोष नांदवे 26वे) वि. वि. . 4 लायन्स एफए : 0
गट बी – ग्रीनबॉक्स चेतक एफसी : 5 (राजदीप भोसले 7वे, 34वे, 47वे, 50वे, अवधूत मोहिते 45वे) वि.वि.सूर्योदय: 2 (ओंकार सुतार 11वे, अथर्व लोंढे 13वे मिनिट)
गट अ – रायझिंग पुणे एफसी: ३ (वंश पाटील ३१वे, ४८वे; विवान डे ४३वे) वि.वि. एफसी: ०
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा
हेही वाचा-
अशोका इलेव्हन, लिजेंड्स युनायटेडचा सहज विजय
घोरपडी तमिळ युनायटेड, केएमपीचे चुरशीचे विजय
PDFA Football League। ४ लायन्स एफए, स्निग्मय ब संघांचा सहज विजय