पाकिस्तानच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये, 1992 सालच्या विश्वविजेत्या पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधार इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्सांफ पक्षाने बहुमत मिळवले आहे.
त्यामुळे इम्रान खान यांचे पंतप्रधान पद नक्की झाले आहे.
इम्रान खान यांच्या पंतप्रधान पदाचा शपथ विधी ११ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे.
यासाठी इम्रान खान यांनी भारताचे महान माजी फलंदाज सुनिल गावस्कर, १९८३ सालच्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार सुनिल गावसकर आणि माजी फलंदाज आणि पंजाबचे पर्यटन आणि सांस्कृतीक मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांना निमंत्रण दिले आहे. याचबरोबर अभिनेता अमिर खानला देखील या शपथ विधीसाठी निमंत्रीत करण्यात आले आहे.
याची माहिती तेहरीक-ए-इन्सांफ पक्षाचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी दिली आहे.
सुनिल गावसकर, कपिल देव, नवज्योत सिंग सिद्धू आणि आमिर खान यापैकी, नवज्योत सिंग सिद्धूनी इम्रान खान यांचे निमंत्रण स्विकारले आहे.
यापूर्वी २०१२ साली सुनिल गावसकरांनी इम्रान खान भविष्यात पाकिस्तानचे पंतप्रधान होणार याची भविष्यवाणी केली होती.
तर कपिल देव यांनीही पाकिस्तानच्या सार्वजनिक निवडणूकीत यश प्राप्त केल्याबद्दल इम्रान खान यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-पहिली कसोटी: पहिल्याच दिवशी अश्विनच्या चार विकेट; भारतीय गोलंदाज चमकले
-भारताकडून २९० खेळाडू कसोटी खेळले, परंतु अशी कामगिरी करणारा अश्विन एकटाच