इंडियन प्रीमीयर लीग २०२१ चे बिगूल आता वाजले आहेत. या हंगामासाठी मागील महिन्याच चेन्नई येथे लिलाव देखील पार पडला. त्यामुळे आता सर्व संघ आयपीएलच्या या नव्या हंगामासाठी सज्ज झाले असून बीसीसीआयनेही तयारी सुरु केली आहे. कोरोनाचा धोका असला तरी सुरक्षेची पूर्ण तयारी करुन हा आयपीएल हंगाम भारतात होण्याची दाट शक्यता आहे.
तसेच यासाठी मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, बंगळुरु आणि चेन्नई या शहरांचा आयपीएलचे सामने आयोजित करण्यासाठी बीसीसीआय विचार करत असल्याचीही चर्चा आहे. बीसीसीआय विचार करत असलेल्या शहरांमध्ये मोहालीचे नाव नसल्याने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विट करत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
त्यांनी ट्विट केले आहे की “यंदाच्या आयपीएल हंगामासाठी मोहाली क्रिकेट स्टेडियमचे नाव वगळण्यात आल्याचे मला आश्चर्य वाटले. मी बीसीसीआय आणि आयपीएलला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा. मोहाली आयपीएलचे आयोजन करु शकणार नाही, असे कोणतेही कारण दिसत नाही. सरकार कोविड-१९ विरुद्ध सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करेल’
I am surprised at the exclusion of Mohali Cricket Stadium for the upcoming IPL season. I urge and appeal to @BCCI & @IPL to reconsider their decision. There is no reason why Mohali can't host IPL and our Government will make all necessary arrangements for safety against #Covid19.
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) March 2, 2021
पंजाब किंग्सचे घरचे मैदान आहे मोहाली
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून स्पर्धेचा भाग असलेला पंजाब किंग्स (पूर्वीचे नाव किंग्स इलेव्हन पंजाब) संघाचे घरचे मैदान हे मोहाली क्रिकेट स्टेडियम आहे. त्यामुळे पंजाबचे सीइओ सतीश मेनन यांनी देखील बीसीसीआय मोहालीचा विचार करत नसल्याचे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पंजाबकडून बीसीसीआयला या संदर्भात पत्र देखील लिहिण्यात आले आहे.
बीसीसीआयकडून कोणतीही पुष्टी नाही
आयपीएलच्या आयोजनासाठी ६ शहरांचा विचार होत असल्याची चर्चा असली तरी अजून बीसीसीआयने याबद्दल कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
अझरुद्दीन यांनी म्हटले हैदराबादमध्येही होऊ शकतात सामने
यापूर्वी भारताचे माजी कर्णधार आणि सध्याचे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मज अझरुद्दीन यांनी देखील म्हटले होते की हैदराबादमध्येही आयपीएलचे सामने आयोजित केले जाऊ शकतात.
आयपीएल २०२० हंगाम झाला होता भारताबाहेर
आयपीएल २०२० चा हंगाम कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे भारताबाहेर युएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ३ मैदानांवर सामने खेळवण्यात आले होते. तसेच प्रेक्षकांविना हे सामने झाले होते. त्याचबरोबर सर्व संघातील सदस्यांना जैवसुरक्षित वातावरणात ठेवण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
ऐकावं ते नवलंच!! सामनावीर पुरस्कार म्हणून क्रिकेटरला दिला चक्क ५ लिटर पेट्रोलचा कॅन
‘त्या’ भीषण घटनेची १२ वर्षे! आजच्याच दिवशी श्रीलंकन संघावर पाकिस्तानमध्ये झाला होता दहशतवादी हल्ला