सोमवारी (२५ एप्रिल) आयपीएल २०२२मधील ३८वा सामना खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज संघ या सामन्यात आमने सामने होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळताना उभय संघांमध्ये शेवटपर्यंत रोमांचक चुरस झाली. अखेर पंजाबने ११ धावांनी हा सामना जिंकला. हा पंजाबचा हंगामातील चौथा विजय होता. तर चेन्नईने त्यांचा सहावा सामना गमावला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित २० षटकांत ४ विकेट्सच्या नुकसानावर १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला २० षटकांंमध्ये ६ विकेट्स गमावत १७६ धावाच करता आल्या.
पंजाबच्या १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून अंबाती रायुडूने चिवट झुंज दिली. परंतु त्याची झुंज अपयशी ठरली. ३९ चेंडू खेळताना २००च्या स्ट्राईक रेटने त्याने ७८ धावा केल्या. परंतु त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. ऋतुराज गायकवाड २७ चेंडूत ३० धावांवर बाद झाला. तसेच कर्णधार रविंद्र जडेजाही १६ चेंडूत २१ धावा करू शकला.
या डावात पंजाबच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. कागिसो रबाडा, रिशी धवन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच संदीप शर्मा आणि अर्शदीप सिंगनेही प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले.
Match 38. Punjab Kings Won by 11 Run(s) https://t.co/d6d0jru21u #PBKSvCSK #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2022
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाबकडून सलामीवीर शिखर धवनने चिवट झुंज दिली. हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील २००वा सामना होता. या सामन्यात त्याने ५९ चेंडू खेळताना २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ८८ धावा फटकावल्या. या खेळीसह त्याने आयपीएलमधील ६००० धावा पूर्ण केल्या असून तो सर्वाधिक धावा फटकावणारा विराट कोहलीनंतरचा दुसराच फलंदाज ठरला आहे. धवनव्यतिरिक्त भानुका राजपक्षेने ३२ चेंडूंमध्ये ४२ धावांचे योगदान दिले.
या डावादरम्यान चेन्नईकडून ब्रावोने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. ४२ धावा देत त्याने भानुका राजपक्षे आणि लियाम लिविंगस्टोनला बाद केले. तसेच महिश तिक्षिणानेही एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
बॅकफूटवर असलेल्या सीएसकेला आणखी एक धक्का, ‘हा’ स्टार अष्टपैलू काही सामन्यांतून बाहेर
अनुभवी असूनही ब्रावोने २ वेळा क्रिज बाहेर फेकला चेंडू, मग अंपायरनेही दिला जशास तसा निर्णय
नया है यह! लाईव्ह सामन्यात फेस प्रोटेक्शन घालून रिशी धवनने केली गोलंदाजी, पण का? जाणून घ्या कारण