Monday, May 23, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बॅकफूटवर असलेल्या सीएसकेला आणखी एक धक्का, ‘हा’ स्टार अष्टपैलू काही सामन्यांतून बाहेर

बॅकफूटवर असलेल्या सीएसकेला आणखी एक धक्का, 'हा' स्टार अष्टपैलू काही सामन्यांतून बाहेर

April 25, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


चार वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेला संघ चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका लागला आहे. चालू आयपीएल हंगामात सीएसकेचे प्रदर्शन आधीच अपेक्षेप्रमाणे होऊ  शकले नाहीये आणि आता त्यांचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली दुखापतग्रस्त झाला आहे. अशात पुढच्या काही सामन्यांसाठी तो अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोमवारी (२५ एप्रिल) पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात देखील तो उपस्थित राहिला नाही.

इएसपीएन क्रिकेइफोने दिलेल्या माहितीनुसार, मोईन अली (Moeen Ali) याच्या घोट्याला दुखापत झाली आहे आणि याच कारणास्तव पुढच्या काही सामन्यांतून त्याला माघार घ्यावी लागू शकते. चालू हंगामात सीएसकेला आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांपैकी अवघे दोन सामने त्यांना जिंकता आले आहेत. अशात आता मोईनच्या दुखापतीमुळे संघाची चिंता अधिकच वाढली आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

माध्यमांतील वृत्तानुसार, शनिवारी (२३ एप्रिल) सीएसकेच्या सराव सत्रात सराव करत असताना मोईन अलीला ही दुखापत झाली आहे. यानंतर त्याला स्कॅन करण्यासाठी पाठवले गेले होते. आता सीएसके त्याच्या स्कॅनच्या रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सविरुद्ध शेवटच्या सामन्यात देखील मोईनने प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर होता. त्याच्या जागी सीएसकेने मिचेल सॅटनरला खेळवले होते. मोईनने सीएसकेसाठी त्याचा शेवटचा सामना १७ एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला होता.

दरम्यान, सीएसकेने चालू आयपीएल हंगामासाठी रिटेन केलेल्या चार खेळाडूंपैकी एक मोईन अली होता, पण त्याला अद्याप अपेक्षित प्रदर्शन करता आलेले नाहीये. त्याने चालू हंगामात आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये १७.४० च्या सरासरीने अवघ्या ८७ धावा केल्या आहेत. असे असले तरी, आगामी सामन्यांमध्ये संघाला त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. मागच्या हंगामात सीएसकेला विजेतेपद मिळवून देण्यासाठी त्याचे योगदान खूप महत्वाचे ठरले होते.

दरम्यान मोईनच्या रूपात सीएसकेला चालू हंगामातील हा तिसरा झटका लागला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चाहरसाठी सीएसकेने मेगा लिलावात १४ कोटी खर्च केले होते, पण दुखापतीमुळे दीपकला संपूर्ण हंगामातून माघार घ्यावी लागली. तसेच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज एडम मिल्नेला हंगामातील पहिल्या सामन्यात दुखापत झाल्यानंतर तो देखील संपूर्ण हंगामातून बाहेर पडला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

पंधरा कोटी पाण्यात घालणाऱ्या इशानविरुद्ध मुंबई इंडियन्स घेणार ‘ऍक्शन’! प्रशिक्षकांकडून संकेत

सामना एक, रेकॉर्ड अनेक! सीएसकेविरुद्ध शिखर धवनचा ‘गब्बर’ पराक्रम, रचले विक्रमांचे मनोरे

सलग ८ पराभवांनंतर रोहित शर्माचे तुटले हृदय, केले भावूक ट्वीट; चाहत्यांचेही मानले आभार


ADVERTISEMENT
Next Post
Ravindra-Jadeja-PBKS

CSKvsPBKS | अंबाती रायुडूची एकाकी झुंज व्यर्थ, पंजाबकडून चेन्नईचा ११ धावांनी पराभव

वयाच्या ६६व्या वर्षी भारताचा माजी क्रिकेटपटू करणार दुसरे लग्न, नवरीचे वय ऐकून बसेल धक्का

थायलंडमध्ये दुसऱ्या क्रमांकासह संजयचे यशस्वी पुनरागमन

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.