बुधवारी (3 मे) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात लियाम लिविंगस्टोन याने धमाकेदार खेळी केली. लिविंगस्टोनच्या या प्रदर्शनामुळेपंजाब किंग्जला 200पेक्षा मोठी धावसंख्या करता आली. दरम्यान ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एखाद्या आयपीएल हंगाने सलग चार सामन्यात 200 धावांपेक्षा मोठी धावसंख्या केली आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या नावावर देखील एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितच्या या निर्णयानंतर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 विकेट्सच्या नुकसानावर 214 धावा केल्या. चालू आयपीएल हंगामातील पंजाब किंग्जचा हा सलग चौथा सामना आहे, ज्यामध्ये 200पेक्षा अधिक धावा त्यांनी केल्या आहेत. सलग चार सामन्यांमध्ये अशी कामगिरी करणारा पंजाब पपहिलाच आयपीएल संघ ठरला आहे.
मागच्या चार सामन्यांमध्ये पंजाब किंग्जचे प्रदर्शन
8 बाद 214 विरुद्ध मुंबई इंडियन्स
10 बाद 201 विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
6 बाद 201 विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
3 बाद 214 विरुद्ध मुंबई इंडियन्स
दुसरीकडे मुंबई इंडियन्ससाठी हा सलग चौथा सामना आहे, ज्यांत विरोधी संघाने 200पेक्षा मोठी धावसंख्या उभी केली आहे. अशी नकोशी कामगिरी नावावर करणारा मुंबई इंडियन्सही आयपीएलमधील पहिलाच संघ आहे.
मागच्या चार सामन्यात मुंबई इंडियन्सला मिळालेले आव्हान
214 विरुद्ध पंजाब किंग्ज
207 विरुद्ध गुजरात टायटन्स
212 विरुद्ध राजस्थान रॉयल्स
214 विरुद्ध पंजाब किंग्ज
दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्सला चांगलाच महागात पडला. आर्चरने टाकलेल्या चार षटकांमध्ये 56 धावा दिल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. त्याने टाकलेल्या 16व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर लियाम लिविंगस्टोनला सलग तीन षटकार मारले. (Punjab Kings becomes the first IPL team ever to score 200+ for the 4th consecutive match.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
11.50 कोटीच्या फलंदाजाकडून जोफ्रा आर्चरचे बेदम धुलाई! पंजाब किंग्जची धावसंख्या पुन्हा एकदा 200+
पावसात ग्राउंड स्टाफच्या मदतीनेला धावला जॉन्टी रोड्स, उत्साह पाहून तुम्हीही कराल कौतुक