---Advertisement---

हंगामातील पहिलाच सामना खेळणाऱ्या ‘या’ शिलेदाराचा केएल राहुल बनला चाहता, केलं तोंडभरुन कौतुक

---Advertisement---

आयपीएल 2021 चा सतरावा सामना केएल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघात आणि मुंबई इंडियन्स संघात खेळण्यात आला. या सामन्यात राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीस आलेल्या मुंबई संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि राहुलने केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर पंजाबने 17.1 षटकात हंगामातील दुसरा विजय नोंदवला. या सामन्यानंतरच्या सादरीकरणात कर्णधार राहुलने रवी बिश्नोईचे कौतुक केले.

या सामन्यानंतरच्या सादरीकरणात विजयायाबाबत बोलताना राहुलने म्हटले की, “एक संघ आणि एक नेता बनून आम्ही खेळलो. यामुळेच आम्हाला विजय मिळवता आला. आम्ही संघातील युवा खेळाडूंना संधी दिली आणि त्यांनी या संधीचे सोने केले. मग तो शाहरुख खान असो किंवा रवी बिश्नोई असो. अनिल यांनी रवीला मार्गदर्शन केले असून त्याचा या सामन्यात आम्हाला फायदा झाला त्याने शानदार गोलंदाजी करत आम्हाला मोठे बळी मिळवून दिले.”

“तसेच आमच्या प्रशिक्षकांनी आमच्यासोबत चर्चा करून नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यास सांगितले. त्यामध्ये आम्ही ऐकले होते की येथे दव पडते. परंतु कितपत पडते हे माहित नव्हते. तसेच या खेळपट्टीवर कोरडा चेंडू मारण्यास अधिक अवघड जाते. परंतु गेलने आत्मविश्वास दाखवत या खेळपट्टीवर चांगली कामगिरी केली. त्याला माहित आहे की कोणत्या गोलंदाजाला खेळायचे आहे आणि कोणत्या गोलंदाजाला खेळायचे नाही,” असे त्याने पुढे सांगितले.

या सामन्यात रवी बिश्नोईने मुंबई इंडियन्समधील स्फोटक फलंदाज इशान किशन आणि सुर्यकुमार यादवला तंबूत पाठवून मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. अशाप्रकारे पंजाबच्या विजयात त्याने मोठा वाटा उचलला. विशेष म्हणजे, बिश्नोईचा हा या हंगामातील पहिलाच सामना होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘जब शिकार करते है, बडा ही करते है,’ पंजाब किंग्जच्या प्रशिक्षकाची मुंबई इंडियन्सला जबरदस्त फटकार

अरे पॉली इतकी घाई! शमीने चेंडू टाकण्यापुर्वीच क्रिज सोडून पळाला पोलार्ड, चाहत्यांनी घेतली शाळा

‘युनिव्हर्स बॉस’चा ९३ मीटरचा गगनचुंबी षटकार, प्रशिक्षक जागचे उठले अन्… बघा झक्कास व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---