इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ३७ वा सामना शनिवार रोजी (२५ सप्टेंबर) फलंदाजीस पोषक असलेल्या शारजाह स्टेडियमवर पार पडला. गुणतालिकेत तळाशी असलेले सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज हे संघ या सामन्यात आमने सामने होते. प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा संघ निर्धारित २० षटकार ७ गडी गमावत १२५ धावा करू शकला. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुसकानावर १२० धावापर्यंत मजल मारू शकला आणि पंजाबने शेवटच्या क्षणी ५ धावांनी विजय मिळवला.
पंजाबच्या १२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्याच चेंडूवर डेविड वॉर्नरच्या रुपात संघाला पहिला धक्का बसला. पुढे कर्णधार केन विलियम्सननेही एका धावेवर विकेट गमावली. मधल्या फळीतील मनिष पांडे (१३ धावा) आणि केदार जाधव (१२ धावा) यांनीही खास खेळी करता आली नाही.
यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि जेसन होल्डर यांनी चिवट झुंज दिली. पण ३१ धावांवर खेळत असलेला साहा १७ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दुर्दैवीरित्या धावबाद झाला. होल्डरने डावाखेर नाबाद ४७ धावांचे योगदान दिले. परंतु शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ७ धावांची गरज असताना तो मोठा फटका खेळू शकला नाही आणि पंजाबने सामन्यात बाजी मारली.
पंजाबकडून गोलंदाजी करताना युवा रवी बिश्नोईने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीनेही २ पलंदाजांना पव्हेलियनला पाठवले. अर्शदीप सिंगनेही एका विकेटचे योगदान दिले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाबला चांगली सुरुवात मिळाली नाही. पंजाबचा कर्णधार आणि सलामीवीर केएल राहुल ४.१ षटकांतच २१ धावा करुन झेलबाद झाला. जेसन होल्डरने जे सुचिथच्या हातून त्याला झेलबाद केले. त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर दुसरा सलामीवीर मयंक अगरवालही ५ धावांवर झेलबाद झाला. पुढे ख्रिस गेल (१४ धावा), ऍडेन मार्करम (२७ धावा) यांनीही लवकरच आपल्या विकेट गमावल्या.
वरच्या फळीतील फलंदाज बाद झाल्यानंतर इतर खेळाडूंचाही हैदराबादच्या गोलंदाजांपुढे टिकाव लागला नाही. त्यामुळे २० षटकात ७ विकेट्सच्या नुसकानावर पंजाबने १२५ धावा केल्या. हैदराबादकडून जेसन होल्डरने ४ षटकात १९ धावा करुन सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच संदीप शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि अब्दुल समद यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली.
That winning feeling! 👏 👏@PunjabKingsIPL hold their nerve and beat #SRH by 5 runs in Sharjah. 👍 👍 #VIVOIPL #SRHvPBKS
Scorecard 👉 https://t.co/B6ITrxUyyF pic.twitter.com/BR2dOwDEfZ
— IndianPremierLeague (@IPL) September 25, 2021
हैदराबादचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ३७ वा सामना शनिवार रोजी (२५ सप्टेंबर) फलंदाजीस पोषक असलेल्या शारजाह स्टेडियमवर होणार आहे. गुणतालिकेत तळासी असलेले सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज हे संघ या सामन्यात भिडणार आहे. तत्पूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७ वाजता नाणेफेक झाली असून हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन याने नाणेफेक जिंकली आहे. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत पंजाबला फलंदाजीसाठी निमंत्रित केले आहे.
Toss Update from Sharjah! @SunRisers have elected to bowl against @PunjabKingsIPL. #VIVOIPL #SRHvPBKS
Follow the match 👉 https://t.co/B6ITrxUyyF pic.twitter.com/Wt5B3W5yoF
— IndianPremierLeague (@IPL) September 25, 2021
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, एडन मार्करम, निकोलस पूरन, दीपक हुडा, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): डेविड वॉर्नर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केन विलियम्सन (कर्णधार), मनीष पांडे, केदार जाधव, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद