---Advertisement---

पहिल्या विजेतेपदासाठी उत्सुक पंजाब किंग्जची पहिली लढत ‘या’ संघाविरुद्ध, बघा राहुलच्या टीमचे पूर्ण वेळापत्रक

On: बुधवार, एप्रिल 7, 2021 4:00 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या (आयपीएल २०२१) हंगाम अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. या हंगामातील पहिला सामना ९ एप्रिल रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे. तर अंतिम सामना ३० मे रोजी अहमदाबाद येथे होईल.

यावर्षीच्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामात पंजाब किंग्ज (जुने नाव किंग्ज इलेव्हन पंजाब) संघाचे नेतृत्व युवा फलंदाज केएल राहुलच करणार आहे. गतवर्षीही राहुलने पंजाबच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळली होती. पंजाबने आत्तापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवलेले नाही. त्यामुळे ते यावर्षी आयपीएलचे पहिले विजेतेपद जिंकण्यास उत्सुक असतील.

यंदा पंजाबचा पहिला आयपीएल सामना १२ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबईत होणार आहे. त्यांच्या साखळी फेरीतील १४ सामन्यांपैकी ११ सामने रात्री ७.३० वाजता सुरू होतील. तर उर्वरित २ सामने दुपारी ३.३० वाजता खेळवले जातील.

आयपीएलचा हा चौदावा हंगाम यावर्षी ५१ दिवसांचा असणार आहे. ९ एप्रिल ते २३ मे या कालावधीत आयपीएल २०२१ चे साखळी सामने पार पडतील. त्यानंतर प्लेऑफचे सामने २५ मे रोजी सुरु होतील. तसेच यावर्षी आयपीएलमध्ये ११ डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी दुपारचे सामने ३.३० वाजता सुरु होतील आणि संध्याकाळचे सामने ७.३० वाजता सुरु होतील.

असे आहे आयपीएल २०२१मधील किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक – 

१२ एप्रिल – मुंबई, राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ एप्रिल – मुंबई, पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
१८ एप्रिल – मुंबई, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ एप्रिल – चेन्नई, पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वाजता
२३ एप्रिल – चेन्नई, पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२६ एप्रिल – अहमदाबाद, पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
३० एप्रिल – अहमदाबाद, पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
२ मे – अहमदाबाद, पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
६ मे – अहमदाबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
९ मे – बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, दुपारी ३.३० वाजता
१३ मे -बंगळुरू, मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग, दुपारी ३.३० वाजता
१५ मे – बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
१९ मे – बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
२२ मे – बंगळुरू, पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता

पंजाब किंग्स – २५ खेळाडू (८ परदेशी)

केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, सरफराज खान, दीपक हूडा, प्रभसिमरण सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल, झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ, शाहरुख खान, मॉझेस हेन्रिक्स, डेव्हिड मालान, फाबियन ऍलेन, जलज सक्सेना, सौरव कुमार, उत्कर्ष सिंग

महत्त्वाच्या बातम्या-

अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेली सीएसके पटकावणार चौथे जेतेपद? पाहा ‘थाला’च्या संघाचे पूर्ण वेळापत्रक

रोहितची पलटण करणार आयपीएल २०२१ चा श्रीगणेशा, आरसीबीविरुद्ध होणार पहिली लढत; पाहा मुंबईचे पूर्ण वेळापत्रक

मुंबई विरुद्ध बेंगलोर सामन्याने होणार आयपीएल २०२१ ची सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---