आयपीएलच्या 13 व्या सत्रात पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना अपयशी ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये येताच आपल्या फलंदाजीची शैली बदलली. गेल्या मोसमात एकही षटकार न मारू शकलेल्या या अष्टपैलू फलंदाजाने मुंबईविरुद्धच्या आयपीएल 2021 च्या सलामी सामन्यात षटकारांची आतषबाजी करण्यास सुरूवात केली.
आयपीएल 2020 मध्ये मॅक्सवेलने 13 सामन्यांत एकूण 108 धावा केल्या होत्या. यामुळेच आयपीएल 2021 च्या पंजा किंग्जने त्याला रिलीज केले. परंतु आरसीबीने चेन्नई सुपर किंग्जबरोबर जोरदार स्पर्धा करत 14.25 कोटी रुपयांमध्ये त्याला विकत घेतले होते. यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यातील त्याच्या खेळीकडे पाहिले असता यंदाच्या मोसमात आरसाबी संघाचे पुरेपुर पैसे वसूल करून देण्याचे त्याने ठरविले असल्याचे दिसत आहे.
मॅक्सवेलच्या दमदार कामगिरीनंतर नेटकऱ्यांनी पंजाब संघाची मालकिन प्रीती झिंटाला लिलावात मॅक्सवेलला सोडण्याबाबत ट्रोल केले आहे. मॅक्सवेल युएईमध्ये चालला नसेल परंतु भारतामध्ये तो नक्कीच जबरदस्त फलंदाजी करणार याची नेटकऱ्यांनी प्रीती झिंटाला आठवण करून दिली आहे. अनेकांनी मीम्स शेअर करत तिला ट्रोल केले आहे.
https://twitter.com/RajaBets/status/1380568085602664452?s=20
https://twitter.com/Aneelgs/status/1380572819407298561?s=20
https://twitter.com/R3Mitul/status/1380566253631381506?s=20
Maxwell to Preity Zinta after he's doing well for RCB : #MIvRCB #IPL2021 pic.twitter.com/r8Qe8Urg9J
— Prince Pandey (@princepandey_) April 9, 2021
Preity Zinta after watching maxwell's performance for RCB pic.twitter.com/rnSfhKJxok
— Sidhansh (@sidhasidhansh) April 9, 2021
https://twitter.com/DoctorrSays/status/1380562695125037061?s=20
https://twitter.com/Kpatel_143/status/1380566246228385792?s=20
मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मॅक्सवेलने 28 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 39 धावा फटकावल्या. त्यानंतर आयपीएल पदार्पणवीर मार्को जेन्सनच्या गोलंदाजीवर ख्रिस लिनने झेल घेत त्याला झेलबाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
“पहिला सामना जिंकण्यापेक्षा विजेतेपद जिंकणे अधिक महत्त्वाचे,” पराभवानंतरही रोहितचे मोठे भाष्य