---Advertisement---

पंजाब किंग्जने शेअर केला गेल आणि चहलचा शर्टलेस फोटो; नेटिझन्सकडून मीम्सचा सुळसुळाट

---Advertisement---

आयपीएल 2021 मध्ये क्रिकेट रसिकांना अनेक उत्कंठावर्धक सामने बघायला मिळत आहेत. मैदानात होणाऱ्या सामन्यांसोबतच स्पर्धेदरम्यान काही हलक्या-फुलक्या गोष्टींकडेही क्रिकेट रसिकांची नजर लागून राहिलेली असते. असाच काहीसा प्रकार नुकत्याच पार पडलेल्या पंजाब किंग आणि रॉयल चॅलेंजेस बेंगलोर दरम्यान झालेल्या सामन्यात घडला.

पंजाब किंग्स आणि बंगलोर मधील सामना संपल्यानंतर पंजाबने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ख्रिस गेल आणि आरसीबीचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलचा शर्टलेस फोटो शेअर केला. या फोटोवर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली असून अनेकांनी चहलला ट्रोल देखील केलेले आहे. तसेच अनेक मीम्सही यानंतर व्हायरल झाले आहेत.

https://twitter.com/PunjabKingsIPL/status/1388200655576342534

चाहत्यांच्या प्रतिक्रिया 

https://twitter.com/Arjunn9999/status/1388246702604230656

https://twitter.com/milanpatel1111/status/1388203505236668417

दरम्यान, सामन्याचा विचार केला असता येथे पंजाबने बंगलोर विरुद्ध शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या पंजाबने निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावत 179 धावांपर्यंत मजल मारली. पंजाब कडून कर्णधार केएल राहुल ने नाबाद 91 तर गेलने 46 धावांची खेळी केली. बँगलोरकडून काईल जेमिसन 2 गडी बाद केले.

प्रत्युत्तरात बँगलोरचा पूर्ण संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 145 धावाच करू शकला व पंजाबने 34 धावांनी सहज विजय मिळवला. पंजाबकडून या सत्रातील पहिलाच सामना खेळत असलेल्या फिरकीपटू हरप्रीत ब्रारने 3 गडी बाद केले. पराभवाची मालिका खंडित करून विजयी मार्गावर परतलेल्या पंजाब संघाकडून समर्थकांना अशाच उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तर दुसरीकडे बंगलोरसाठी आता काही प्रमाणात धोक्याची घंटी वाजणे सुरू झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आज आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूंना एकेकाळी रणजी संघात स्थानासाठी करावा लागला होता संघर्ष, प्रशिक्षकांनी केला खुलासा

‘महाराष्ट्र दिना’निमित्त ‘मास्टर ब्लास्टर’ने शेअर केली वडिलांची कविता, तुम्हालाही नक्कीच आवडेल

मुंबईच्या शिलेदारांना जहीरने दिला विजयाचा मंत्र, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---