आयपीएलच्या 17 व्या हंगामात सलामीचा सामना झाला असून सीएसकेने आरसीबीचा ही 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. तर आज शनिवारी ‘डबल हेडर’मध्ये पहिला सामना पंजाब किंग्ज विरूद्ध दिल्ली कॅपिटल्सचा असा सामना रंगणार आहे. तसेच या सामन्यात पंजाब किंग्सची धुरा शिखर धवनच्या हाती, तर दिल्ली कॅपिटल्सची धुरा ऋषभ पंतच्या हाती असणार आहे. तर या सामन्यात सर्वांच्या नजरा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतवर लागून राहिल्या आहेत.
याबरोबरच, या सामन्यात पंजाब किंग्जने टॉस जिंकला असून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा सामना नवीन स्टेडियम मुल्लानपूर येथे खेळला जात आहे. तर या सामन्यात ऋषभ पंत कार अपघातानंतर तब्बल 15 महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करत आहे. त्यामुळे आता पंतचे पुनरागमन कसे होते हे बघावे लागणार आहे.
अशातच पंजाबचे चार परदेशी खेळाडू म्हणजे जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन आणि कागिसो रबाडा. त्याचवेळी दिल्लीचे चार विदेशी खेळाडू शाई होप, मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर आणि ट्रिस्टन स्टब्स आहेत.
दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ 32 वेळा भिडले आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरशीची पाहायला मिळाली आहे. पंजाब आणि दिल्लीने प्रत्येकी 16-16 सामने जिंकले आणि गमावले आहेत. गेल्या मोसमात पंजाब किंग्सने दोन्ही सामने जिंकले होते.
दोन्ही संघांची प्लेइंग 11 –
पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग.
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा.
महत्त्वाच्या बातम्या-
- मुस्लिम मुलीसोबत प्रेम आणि नंतर लग्न, अशी आहे शिवम दुबेची फिल्मी लव्हस्टोरी
- आयपीएलच्या पहिल्या सामन्यातच राडा! विराट कोहलीची रचिन रवींद्रला जाहीर शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल