---Advertisement---

PBKS vs SRH: पंजाब किंग्सने टॉस जिंकला, हैदराबादला दिले गोलंदाजीचे आमंत्रण

On: शनिवार, एप्रिल 12, 2025 7:21 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील आज 12 एप्रिल रोजी 27 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स संघात राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैदराबाद वर खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सनरायझर्स हैदराबादला गोलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाने आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये फक्त एका सामन्यात विजय तसेच चार सामन्यात पराभव पत्करलेला आहे. पंजाब किंग्सने आत्तापर्यंत चार सामन्यांमध्ये तीन विजय तसेच एक हार पत्करलेली आहे.

पंजाब किंग्स पॉईंट्स टेबलवर पाचव्या स्थानी तर हैदराबाद संघ दहाव्या स्थानी आहे. दोन्ही संघ फक्त लीग स्टेजमध्ये एकदाच समोरासमोर असणार आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघासाठी फलंदाजांनी तसेच गोलंदाजांनीही नीट खेळणे गरजेचे आहे. पंजाब किंग्सने आतापर्यंत स्पर्धेत चांगलं प्रदर्शन केलं आहे.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्स: श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, नेहाल वडेरा, शशांक सिंग, मार्को यान्सन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन

सनरायझर्स हैदराबाद: पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेन्री क्लासेन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, जीशान अन्सारी, ईशान मलिंगा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---