आयपीएल 2025 स्पर्धेतील 22 वा सामना आज(08 एप्रिल) रोजी पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स दोन्ही संघात मुल्लांपुर येथील महाराजा यादविंद्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मैदानावर होणारा स्पर्धेतील दुसरा सामना आहे. सामना रात्री 7.30 वाजता सुरू होईल. हा सामना कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड यांच्यामध्ये असणार आहे. जाणून घ्या सामन्याची खेळपट्टी रिपोर्ट आणि दोन्ही संघांचे हे टू हेड रेकॉर्ड्स.
पंजाब किंग्सने 3 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 2 सामन्यात विजय मिळवलेला आहे. संघाने मागचा सामना गमावला होता. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाची सध्याची स्थिती खूप खराब आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघाने हंगामातील पहिला सामना जिंकला होता, पण त्यानंतर त्यांनी सातत्याने 3 सामने गमावले आहेत.
चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्समध्ये आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघ पहिल्या हंगामापासून खेळत आहेत. बॅनच्या कारणाने सीएसके दोन हंगामात खेळू शकली नव्हती. रेकॉर्डमध्ये कोणत्याही एका संघाचं पारडं जड नाही.
एकूण सामने: 30
PBKS विजय- 14
CSK विजय- 16
मुल्लांपुर क्रिकेट स्टेडियमच उद्घाटन मागच्या हंगामात झाले आहे. तेव्हा पहिल्यांदा पंजाब किंग्सने त्यांचे घरेलू सामने याच मैदानावर खेळले होते. या मैदानावर आत्तापर्यंत 6 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये तीन वेळा प्रथम फलंदाजी करणारा तसेच तीन वेळा प्रथम गोलंदाजी करणारा संघ विजयी झाला आहे.
मुल्लांपुर क्रिकेट स्टेडियममध्ये फलंदाजांसाठी मदत मिळू शकते. या मैदानावर धावा करणे खूप कठीण आहे, पण यावेळेस खेळपट्टी वेगळी दिसत आहे. मैदानावर 190 च्या आसपास धावसंख्या बनू शकते. टॉस जिंकून येथे प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चांगला ठरू शकतो. जर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने विरोधी संघाला 160 धावसंख्या पर्यंत थांबवलं तर धावांचा पाठलाग करणे सोपे जाऊ शकते. फिरकीपटूंच्या तुलनेत वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवर जास्त मदत मिळू शकते.






