दोन महिने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२२चा हंगाम रविवारी (दि. २९ मे) दिमाखात पार पडला. आयपीएलला यंदा नवा विजेता मिळाला. नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद येथे पार पडलेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात गुजरातने ७ विकेट्सने सामन्यावर ताबा मिळवला. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच गुजरात या हंगामात खेळत होता आणि त्यांनी हा हंगाम गाजवत विजेतेपद पटकावले. या हंगामातही नवीन पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दिली जाणारी कॅप) विजेता मिळाला.
आयपीएल २०२२ला नवीन पर्पल कॅप विजेता मिळाला. हा खेळाडू सीएसके किंवा केकेआर संघाचा नाही, तर राजस्थान रॉयल्स संघाचा युझवेंद्र चहल आहे. चहलने या हंगामात २७ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणकोणत्या खेळाडूला पर्पल कॅप मिळाली आहे? या लेखातून आपण त्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया… (Purple Cap Holders In IPL History See List)
#आतापर्यंत आयपीएलमध्ये पर्पल कॅप पटकावणारे गोलंदाज-
१. आयपीएल २००८- सोहेल तन्वीर
राजस्थान रॉयल्स संघाचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरने आयपीएल २००८ च्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. त्याने ११ सामने खेळताना १२.०९च्या सरासरीने २२ विकेट्स घेतल्या होत्या. या हंगामात त्याची १४ धावा देत ४ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी होती. यासह त्याने पर्पल कॅप आपल्या नावावर केली होती.
२. आयपीएल २००९- आरपी सिंग
आयपीएल २००९ मध्ये डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळताना वेगवान गोलंदाज आरपी सिंगने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने १६ सामने खेळताना १८.१३ च्या सरासरीने २३ विकेट्स घेतल्या होत्या. या हंगामात त्याची २२ धावा देत ४ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी होती. या कामगिरीच्या जोरावर त्याने आयपीएल २००९ ची पर्पल कॅप पटकावली होती.
३. आयपीएल २०१०- प्रज्ञान ओझा
आयपीएल २०१० मध्ये डेक्कन चार्जर्स संघाच्याच गोलंदाजाने पर्पल कॅपवर आपले नाव कोरले होते. तो गोलंदाज इतर कोणी नसून प्रज्ञान ओझा आहे. त्याने १६ सामने खेळताना २०.४२ च्या सरासरीने सर्वाधिक २१ विकेट्स घेतल्या होत्या. या हंगामात त्याची २६ धावा देत ३ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी होती.
४. आयपीएल २०११- लसिथ मलिंगा
मुंबई इंडियन्स संघाचा घातक वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने आयपीएल २०११ मध्ये आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला होता. त्याने १६ सामने खेळताना १३.३९ च्या सरासरीने २८ विकेट्स घेतल्या होत्या. या हंगामात त्याची १३ धावा देत ५ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी होती. यामुळे त्याने आयपीएल २०११ ची पर्पल कॅप आपल्या नावावर केली होती.
५ आयपीएल २०१२- मॉर्ने मॉर्केल
दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलने आयपीएल २०१२ ची पर्पल कॅप आपल्या नावावर केली होती. त्याने १६ सामने खेळताना १८.१२ च्या सरासरीने २५ विकेट्स घेतल्या होत्या. या हंगामात त्याची २० धावा देत ४ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी होती.
६. आयपीएल २०१३- ड्वेन ब्रावो
चेन्नई सुपर किंग्स संघाचा वेगवान गोलंदाज ड्वेन ब्रावोने आयपीएल २०१३ च्या पर्पल कॅपवर आपले नाव कोरले होते. त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्याने १८ सामने खेळताना १५.५३ च्या सरासरीने सर्वाधिक ३२ विकेट्स घेतल्या होत्या. या हंगामात त्याची ४२ धावा देत ४ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी होती.
७. आयपीएल २०१४- मोहित शर्मा
चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना मोहित शर्माने आयपीएल २०१४मध्ये आपल्या गोलंदाजीने कहर केला होता. त्याने १६ सामने खेळताना १९.६५ च्या सरासरीने सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्या होत्या. या हंगामात त्याची १४ धावा देत ४ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी होती. यासह त्याने पर्पल
८. आयपीएल २०१५- ड्वेन ब्रावो
चेन्नई सुपर किंग्स संघाचा वेगवान गोलंदाज ड्वेन ब्रावोने आयपीएल २०१३ नंतर आयपीएल २०१५ मध्येही पर्पल कॅपवर आपले नाव कोरले होते. त्याने या हंगामात १७ सामने खेळताना १६.३८ च्या सरासरीने २६ विकेट्स घेतल्या होत्या. या हंगामात त्याची २२ धावा देत ३ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी होती.
९. आयपीएल २०१६- भुवनेश्वर कुमार
सनरायझर्स हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आयपीएल २०१६मध्ये सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप आपल्या नावावर केली होती. त्याने १७ सामने खेळताना २१.३० च्या सरासरीने २३ विकेट्स घेतल्या होत्या. या हंगामात त्याची २९ धावा देत ४ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी होती.
१०. आयपीएल २०१७- भुवनेश्वर कुमार
सनरायझर्स हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आयपीएल २०१६ पाठोपाठ आयपीएल २०१७मध्येही पर्पल कॅप आपल्या नावावर केली होती. त्याने १४ सामने खेळताना १४.१९ च्या सरासरीने २६ विकेट्स घेतल्या होत्या. या हंगामात त्याची १९ धावा देत ५ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी होती.
११. आयपीएल २०१८- अँड्र्यू टाय
पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अँड्र्यू टायने आयपीएल २०१८ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. त्याने १४ सामने खेळताना १८.६६ च्या सरासरीने २४ विकेट्स घेतल्या होत्या. या हंगामात त्याची १६ धावा देत ४ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी होती. यासह त्याने पर्पल कॅपवर आपले नाव कोरले होते.
१२. आयपीएल २०१९- इम्रान ताहिर
चेन्नई सुपर किंग्स संघाचा फिरकीपटू इम्रान ताहिरने आयपीएल २०१९ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅपवर आपले नाव कोरले होते. त्याने १७ सामने खेळताना १६.५७ च्या सरासरीने २६ विकेट्स घेतल्या होत्या. या हंगामात त्याची १२ धावा देत ४ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी होती.
१३. आयपीएल २०२०- कागिसो रबाडा
दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने आयपीएल २०२० मध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच हैराण केले होते. त्याने १७ सामने खेळताना १८.२६ च्या सरासरीने ३० विकेट्स घेतल्या होत्या. या हंगामात त्याची २४ धावा देत ४ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी होती. यासह त्याने पर्पल कॅपवरही आपले नाव कोरले होते.
१४. आयपीएल २०२१- हर्षल पटेल
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आयपीएल २०२१ चा हंगाम अक्षरश: गाजवला आहे. त्याने आपल्या भेदक गोलंदाजीने आपल्या संघाला महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या आहेत. त्याने या हंगामात १५ सामने खेळताना १४.३४ च्या सरासरीने तब्बल ३२ विकेट्स घेतल्या. या हंगामातील त्याची २७ धावा देत ५ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
१५. आयपीएल २०२२- युझवेंद्र चहल
आयपीएल २०२२ला नवीन पर्पल कॅप विजेता मिळाला. राजस्थान रॉयल्स संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने नेहमीप्रमाणे आपल्या फिरकीने फलंदाजांना गोत्यात आणले. तसेच, मोक्याच्या क्षणी आपल्या संघाला संकटातून बाहेर काढण्यातही मोलाचा वाटा उचलला. त्याने या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप नावावर केली. या हंगामात त्याने १७ सामन्यात गोलंदाजी करताना १९.५१च्या सरासरीने आणि ७.७५च्या इकॉनॉमी रेटने सर्वाधिक २७ विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामातील त्याची ४० धावा देत ५ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जिंकलस रे भावा! बटलरने गाजवला IPL 2022चा हंगाम, सर्वाधिक धावा करत मोडला वॉर्नरचा भलामोठा विक्रम
फक्त पंड्या अन् ‘या’ भारतीय कर्णधाराला जमलाय IPL Finalमध्ये विकेट घेण्याची किमया, वाचा सविस्तर
कानामागून आला आणि तिखट झाला; एकच चेंडू फेकला आणि उमरान मलिकचं बक्षीस घेऊन गेला