---Advertisement---

IPL २०२२ | अहमदाबाद, लखनौ यांच्या रिटेन्शननंतर कुणाच्या खिशात किती रक्कम शिल्लक? पाहा संघनिहाय यादी

On: शुक्रवार, जानेवारी 21, 2022 11:57 PM
IPL Logo
---Advertisement---

आयपीएल २०२२साठीच्या रिटेन्शनची प्रक्रिया शुक्रवार (२१ जानेवारी) रोजी संपू्ष्टात आली. आयपीएलमध्ये नव्याने सामिल झालेले दोन संघ म्हणजेच लखनौ आयपीएल फ्रँन्चायझी आणि अहमदाबाद आयपीएल फ्रँन्चायझी यांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची अंतिम आणि अधिकृत यादी जाहीर केली. या अधिकृत घोषणांनंतर आयपीएल २०२२साठी आता सर्व संघांकडे लिलावात सहभागी होताना हाती किती रक्कम शिल्लक असेल याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

शुक्रवारी (२१ जानेवारी) अहमदाबाद संघाने त्यांचे तीन रिटेन खेळाडू हार्दिक पांड्या (१५ कोटी) रशीद खान (१५ कोटी) शुभमन गिल (८ कोटी) असे एकूण ३८ कोटी खर्च केले. तर लखनौ संघाने केएल राहुल (१७ कोटी) मार्कस स्टोईनिस (९.२ कोटी) रवि बिश्नोई (४ कोटी) असे एकत्रित ३०.२ कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे आता सर्व संघाचे रिटेन्शन प्रक्रिया संपली आहे. तसेच आयपीएलच्या दहा संघांकड प्रत्येकी किती रक्कम लिलावासाठी शिल्लक आहे, ते समोर दिसत आहे. (Purse remaining for 10 IPL teams)

आयपीएलच्या दहाही संघांच्या पोथडीत शिल्लक रक्कम :

  • पंजाब किंग्ज – ७२ कोटी
  • सनरायझर्स हैदराबाद – ६८ कोटी
  • राजस्थान रॉयल्स – ६२ कोटी
  • लखनौ – ५८ कोटी
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – ५७ कोटी
  • अहमदाबाद – ५२ कोटी
  • मुंबई इंडियन्स – ४८ कोटी
  • चेन्नई सुपर किंग्ज – ४८ कोटी
  • कोलकाता नाईट रायडर्स – ४८ कोटी
  • दिल्ली कॅपिटल्स – ४७.५ कोटी

एकत्रित रित्या पंजाब, हैदराबाद आणि राजस्थान वगळता सध्या सर्वच संघांकडे कमीअधिक जवळपास समान रक्कम शिल्लक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत प्रत्येक संघ (फ्रँचायझी) कशी बोली लावते हे पहावे लागेल.

शुक्रवारी अहमदाबाद आणि लखनौ संघांनी त्यांचे रिटेन केलेले खेळाडू यांची नावे जाहीर केल्याने आता प्रत्येक संघाचे कायम केलेले खेळाडू कोण हे जवळपास निश्चित झालंय. तर पाहूयात कोणत्या संघाने कोणकोणत्या  खेळाडूंना रिटेन केलंय.

  • मुंबई इंडियन्स –

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर –

  • पंजाब किंग्ज –

  • सनरायझर्स हैदराबाद –

  • चेन्नई सुपर किंग्ज –

  • दिल्ली कॅपिटल्स –

  • कोलकाता नाईट रायडर्स –

  • राजस्थान रॉयल्स –

लखनौ फ्रँचायझी –

  • अहमदाबाद फ्रँचायझी –

https://twitter.com/AIT_ki_tweets/status/1484585979629694976?s=20

 

अधिक वाचा –

बेधडकपणे खेळणाऱ्या पंतबद्दल या गोष्टी नक्कीच माहित नसतील| Rishabh Pant Facts

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---